केवयसी म्हणजे काय व कशी करावी EKYC ?
24-12-2022
केवायसी म्हणजे काय व कशी करावी EKYC ?
केवायसी म्हणजे काय? –
केवायसी हे “नो युअर कस्टमर”(Know Your Customer) चे संक्षिप्त रूप आहे आणि ही संज्ञा कोणत्याही वित्त संस्थेत ग्राहकाचे खाते उघडण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जाते एक भाग आहे. केवायसी संबंधित कागदपत्रे, जसे की विहित छायाचित्र पुरावा(उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा तसेच व्यक्ती सत्यापन(इन पर्सन व्हेरिफिकेशन(IPV) यांच्याद्वारे गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध करतात. केवायसी अनुपालन हे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 आणि त्या अंतर्गत घालून दिलेल्या नियमांतर्गत तसेच ऍन्टी मनी लॉन्ड्रिंग स्टॅन्डर्ड्स(AML)/ कॉम्बॅटिंग द फायनान्शियल टेररिझम(CFT)/ऑब्लीगेशन्स ऑफ सिक्युरिटीज मार्केट इंटरमिडीयेटरीज वरील सेबीच्या (SEBI) मुख्य परिपत्रकाअंतर्गत सक्तीचे आहे.
बँकेत खाते सुरू करते वेळी बँक आपल्याला काही कागदपत्रे मागते, त्यात आपली ओळख, पत्ता असलेले Document असते, यालाच KYC प्रक्रिया असे म्हणतात. ग्राहकांची ओळख तपासणी करण्यासाठी बँक कागदपत्रे मागत असते. KYC चा उपयोग फक्त बँकेत नाही तर, ऑनलाईन शॉपिंग साईट्स, Mutual Funds Account, डिमॅट अकाउंट ओपन करतानाही केला जातो.
नवीन सिम कार्ड घेताना आपले आधार कार्ड तपासले जाते याला सुद्धा KYC प्रक्रिया म्हणतात. वाढत चाललेली धोकेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा निर्माण घेतला होता, यामुळे कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या नावाचा दुरुपयोग नाही करू शकणार व Money Laundering सारख्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसेल.
केवायसी चे खालील दोन प्रकार आहेत –
आपण वरती पाहिले की KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करणे शक्य आहे, यावरूनच KYC चे दोन Types पडलेले आहेत.
१) CKYC
CKYC चे पूर्ण नाव Central Know your Customer असा होतो. ही प्रक्रिया भारतातील सर्व बँकेत वापरली जाते, त्यामुळे याला Central KYC म्हणतात. CKYC प्रक्रियेत बँकेत कागदपत्रे जमा करून फॉर्म भरून द्यावा लागतो.
२) EKYC
ई-केवायसी चे पूर्ण नाव Electronic Know your Customer असा होतो. EKYC प्रक्रिया कागद विरहित असते. ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते व यात भौतिक स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता नसते.
केवायसी फुल फॉर्म –
KYC चा फुल फॉर्म Know Your Customer असा होतो. मराठी मध्ये याचा अर्थ आपल्या ग्राहकास जाणून घ्या असा होतो. सर्व बँक, किंवा असे ठिकाणे जेथे Financial Transaction केले जातात त्यांना सर्वांना ग्राहकाबद्दल माहिती घेण्याचा अधिकार असतो. ग्राहकांची माहिती घेऊन त्यांची ओळख पडताळणी केली जाते.
केवायसी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड/ओळखपत्र
- आधार कार्ड
- वाहक परवानाही कागदपत्रे
- पासपोर्ट
केवायसी करण्याची गरज का आहे? –
आपल्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल तर बँकांना आपल्या ग्राहकांकडून KYC करून घेण्याची गरज का पडली? जेंव्हा ग्राहक बँकेत खाते खोलतो त्यावेळेस तो वयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, ई बँकेला सांगतो. पण दिलेली माहिती खरी आहे का खोटी हे बँकेला माहिती होण्यासाठी ठोस पुरावा द्यावा लागतो. याने बँकेला कळते की ग्राहकाने दिलेली माहिती खरी आहे. यासाठीच सर्व वित्तीय संस्थानात KYC अनिवार्य केलेली आहे.
पैशांची धोकेबाजी, Money Laundering अश्या गोष्टींना रोखण्यासाठी KYC महत्वाची असते. KYC प्रक्रिया ने व्यक्तीची Financial History बद्दल कळते. KYC केल्याशिवाय बँकेत खाते खोलता येत नाही, Mutual Funds मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. केवायसी (KYC) Verification करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कशी करायची पीएम किसान सन्मान निधी साठी ई-केवायसी?
खालील लिंकवर जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता.:
https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx