गव्हाची दरवाढ कायम राहणार? जाणून घ्या दर

04-02-2023

गव्हाची दरवाढ कायम राहणार? जाणून घ्या दर

गव्हाची दरवाढ कायम राहणार? जाणून घ्या दराचा अंदाज

 

सध्या देशात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले गेले आहे. यामुळे यामध्ये याचा दरावर काय परिणाम होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशातील गहू दर कमी करण्यासाठी सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विक्रीचा निर्णय घेतला.

 

असे असताना त्यापैकी सरकारने विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास २४ लाख टन गहू विक्रीसाठी निवादा मागवल्या होत्या. १ फेब्रुवारीला सरकारने जवळपास ९ लाख टन गहू निविदांच्या माध्यामातून विकल्याची माहीती सुत्रांनी दिली.

 

यामुळे आता पुढे काय असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. गहू खरेदीसाठी १ हजार १०० निविदा आल्या होत्या. २२ राज्यांमध्ये हा गहू विकला गेला. या लिलावात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील केंद्रावर सर्वाधिक २ हजार ९५० रुपयाने गहू खरेदी करण्यात आला.

 

यामुळे आपल्या राज्यात परिस्थिती काय राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये २ हजार ३८० रुपयांपासून गहू खरेदी करण्यात आला. तर सरासरी किंमत २ हजार ४०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती.

 

केंद्र सरकारने दर कमी करण्यासाठी गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र लिलावात भारतीय अन्न महामंडळानेच जास्त दरात विकला. यामुळे आता हा अंदाज फसला असेच म्हणावे लागेल.

 

यामुळे गव्हाची किंमत वाढणार असे सांगितले जात आहे. सध्या खुल्या बाजारात गव्हाला २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. यामुळे गव्हाचे हे दर कायम राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

source : krishijagran

wheat rate, Wheat price forecast

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading