पशुधनाच्या चाऱ्यासाठी योजना, प्रक्षेत्रावर गवत लागवड...

01-08-2024

पशुधनाच्या चाऱ्यासाठी योजना, प्रक्षेत्रावर गवत लागवड...

पशुधनाच्या चाऱ्यासाठी योजना, प्रक्षेत्रावर गवत लागवड...

हिंगोली जिल्हयामधील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राच्या जमिनींवर यंदा कोम्बो, मुम्बासा, सुपर नेपिअर इत्यादि विदेशी जातींच्या गवतासह देशी गवताची लागवड सुद्धा करण्यात येत आहे. लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यामध्ये गवत कापणीसाठी उपलब्ध होते.

महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या वळूमाता प्रक्षेत्रावर असलेल्या गुरांसाठी बारा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध व्हावा, त्या दृष्टीने नियोजन केले जाते. हिंगोली, भोगाव व इसापूर येथे पशुपैदास प्रक्षेत्राची शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीवर चारा उगवला जातो.

प्रामुख्याने हिंगोली येथील प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या गवतांची लागवड करण्यात येते. या वर्षी पाऊस वेळेत पडल्याने इसापूर रमना भागात चाऱ्यासाठी लागणार्‍या ज्वारीची पेरणी करण्यात आली. त्यामुळे आता पशुंना हिरवा चारा मिळण्यासाठी काही अडचण येणार आहे.

सततच्या पावसाचा व्यत्यय:

आठवडा भरापासून सतत पाऊस पडत असल्याने गवत लागवडीच्या कामात अस्थिरता येऊ लागली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात इसापूर रमना भागातील जमिनीवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, सध्या हिंगोली प्रक्षेत्रावर देशी-विदेशी गवताची लागवड केली जात आहे.

प्रक्षेत्रावर सर्व गुरांसाठी चारा:

हिंगोलीच्या शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रावर सध्या लहान-मोठ्या किमान १८० म्हशी आहेत. त्यातील काही दुभत्या म्हशी असून, दूध विक्रीतून प्रक्षेत्राला महसूल मिळतो. या म्हशीसाठी चारा उपलब्ध व्हावा, याकरिता आता प्रक्षेत्राकडे असलेल्या जमिनीवर विविध प्रकारच्या चाऱ्याची लागवड ही करण्यात येत आहे.

देशीसह विदेशी गवत सुद्धा:

हिंगोली जवळील क्षेत्रावर सुपर नेपियर, फोर-जी बुलेट, ऑस्ट्रोनियनरेड, बांगलादेश हाफ रेड, बाहुबलीसह कोम्बो, मुम्बासा, मारवेल, पेन्सिल गवत, ऊसक्रॉस आदी देशी-विदेशी गावतांची लागवड करण्यात येत आहे.

गवत लागवड, पशुपैदास प्रक्षेत्र, विदेशी गवत, चारा उत्पादन, हिरवा चारा, देशी गवत, पशुधन विकास, चारा योजना, सुपर नेपियर, gawat, गवत, गुरांसाठी चारा

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading