कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ…
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने मार्फत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. परंतु, काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नाही.
त्या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. राज्यात या काळात ३३ हजार १६६ शेतकऱ्यांपैकी फक्त १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केल्याचे स्पष्ट झाले आहे
प्रामाणिकपणे कर्जफेड करून सुद्धा या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणताही लाभ देण्यात येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली.
१२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात मुभा होती :
शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते.
पण, राज्यामधील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती.
राज्यात असे ३१ हजार १६६ शेतकरी होते. मात्र, या कालावधीमध्ये केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण केले आहे.
अजून सुद्धा १६ हजार ३५५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. राज्यस्तरावर ही संख्या मोठी असल्याने या योजनेला आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.
त्यामुळे आता या काळामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरण करून प्रोत्साहनपर निधीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
आधार प्रमाणीकरण न केलेले जिल्हानिहाय शेतकरी:
जिल्हा
आकडेवारी
पुणे
651
ठाणे
64
पालघर
140
रायगड
174
रत्नागिरी
637
सिंधुदुर्ग
224
नाशिक
484
धुळे
229
नंदुरबार
145
जळगाव
1053
नगर
706
सोलापूर
260
कोल्हापूर
1427
सांगली
446
सातारा
537
संभाजीनगर
394
जालना
430
परभणी
132
हिंगोली
127
लातूर
993
धाराशिव
1958
बीड
226
नांदेड
872
अमरावती
234
अकोला
119
वाशिम
161
बुलढाणा
100
यवतमाळ
1303
नागपूर
483
वर्धा
209
चंद्रपूर
324
भंडारा
681
गडचिरोली
175
गोंदिया
247
एकूण
16,345
आधार खाते, आधार प्रमाणीकरण, कर्जमुक्ती योजना, शेतकरी मुदतवाढ, प्रोत्साहन अनुदान, कर्जफेड शेतकरी, राज्य सरकार, आधार, शेतकरी लाभ, aadhar, karja, karjamukti, mahatma fule, shatkari