राज्यातील कृषी व्यवसायांना आला वेग, शेतकर्‍यांसाठी फलोत्पादन योजना...

03-08-2024

राज्यातील कृषी व्यवसायांना आला वेग,  शेतकर्‍यांसाठी फलोत्पादन योजना...

राज्यातील कृषी व्यवसायांना आला वेग,  शेतकर्‍यांसाठी फलोत्पादन योजना…

 

फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य आहे. तसेच राज्यातील शेतकर्‍यांचे दृष्टीने फलोत्पादन क्षेत्राचा विकास ही महत्त्वाची बाब आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबवण्यात येत आहे.

हा प्रकल्प आशियाई विकास बँक यांचे आर्थिक सहकार्याने तसेच सहकार व पणन विभागा मार्फत मॅग्नेट सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. 

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्यासाठी आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ दौऱ्यावर आले होते.

या शिष्टमंडळामध्ये आशियाई विकास बँकेचे वरिष्ठ संचालक क्यूंगफेंग सँग, देशातील मुख्यालयाच्या प्रमुख मिओ ओका तसेच यास्मिन सिद्दीकी, ताकेशी यूएडा, अलेक्सीया मायकेल्स, नारायण अय्यर, विकास गोयल, कृष्णन रौटेला, राघवेंद्र एन. यांचा समावेश होता.

मुंबई मध्ये झालेल्या प्रकल्पाच्या आढावा बैठकीमध्ये मॅग्नेट संस्थेचे अध्यक्षांसह सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सन २०२१ पासून महाराष्ट्राच्या फलोत्पादन मूल्य साखळी विकासासाठी कार्यरत मॅग्नेट प्रकल्पाची प्रगती व भविष्यातील नियोजन याबाबत आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळास माहिती दिली.

प्रकल्पाच्या प्रगतीबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. या प्रकल्पामध्ये शेतकर्‍यांची क्षमता वाढवून करून फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादनात वाढ करणे. साठवणूक तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे अशा गोष्टींचा समावेश आहे

प्रकल्पातून विकसीत करण्यात येत असलेल्या एस.आर.पी. ओव्हरसीज, नवी मुंबई या प्रकल्पास दि.३० जुलै २०२४ रोजी शिष्टमंडळाने भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली. 

फळे व भाजीपाला व इतर कृषिमाल निर्यातीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असुन प्रकल्प उभारणी दरम्यान आशियाई विकास बँकेचे पर्यावरणीय व सामाजिक निकष पूर्तता होत असल्याबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.

वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्ट्यूिट ऑफ को-ऑपरेटीव्ह मॅनेजमेंट, पुणे येथे झालेल्या चर्चासत्रामध्ये, या शिष्टमंडळाने मॅग्नेट प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणुकदार यांचेशी चर्चा केली.

प्रकल्पामध्ये आलेले अनुभव, लाभार्थ्यांच्या सूचनांवर चर्चा करुन कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करावेत, अशी सूचना वरिष्ठ सेक्टर डायरेक्टर यांनी दिली. कृषि, अन्न, निसर्ग आणि ग्रामीण विकास सेक्टर कार्यालय, आशियाई विकास बँक यांनी केली.

वित्तीय संस्थांकडून कर्ज पुरवठाबाबत प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या बँक ऑफ इंडिया, मे. समुन्नती फायनानशिएल इंटरमेडीएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व मे. फेडरल बँक या तीन वित्तीय संस्थांना १५८ कोटी रुपये कर्जस्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत.

या संस्थांमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणुकदार यांना सवलतीच्या व्याजदरात खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्जाच्या स्वरुपात वित्त पुरवठा करण्यात येत आहे. संबंधीत वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी देखील या चर्चासत्रात उपस्थित होते.

या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान प्रकल्प संचालक विनायक कोकरे तसेच डॉ. अमोल यादव, अतिरीक्त प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प यांनी राज्यातील फलोत्पादन क्षेत्रामध्ये मॅग्नेट प्रकल्पाचे माध्यमातून झालेल्या कामकाजाबाबत शिष्टमंडळास संपूर्ण माहिती दिली. 

मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी सहाय्य सल्लागार संस्था मे. ग्रॅण्ट थॉर्टनचे संचालक चेतन भक्कड हे देखील या दौऱ्यात सहभागी झाले होते.

 

एकात्मिक मूल्य साखळ्यांचा विकास:

मॅग्नेट प्रकल्पामध्ये डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, पडवळ, लिंबू व फुलपिके या फलोत्पादन पिकांच्या उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यात भर दिली जात आहे.

फलोत्पादन योजना, कृषी व्यवसाय, मॅग्नेट प्रकल्प, आर्थिक सहकार्य, सहकार विभाग, शेतकरी लाभ, शेतकरी योजना, कर्ज पुरवठा, फळ उत्पादन, पायाभूत सुविधा, गुणवत्ता वाढ, शेतकरी संस्था, सवलतीचे कर्ज, प्रकल्प अंमलबजावणी, पर्यावरणीय निकष, फायदेशीर गुंतवणूक, shetkari

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading