राज्यात डिजिटल शेतीला चालना, अॅग्रिस्टॅक योजनेचा निर्णय...
11-10-2024
राज्यात डिजिटल शेतीला चालना, अॅग्रिस्टॅक योजनेचा निर्णय...
केंद्राची अॅग्रिस्टॅक योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
राज्यामधील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व सोपे व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक डिजिटल अॅग्रिकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच तसेच भूसंदर्भाकीत भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल. यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना कृषि विभाग करेल.
यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून जवळ जवळ ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.