Havaman andaj : आजचा हवामान अंदाज - 9 सप्टेंबर 2023
09-09-2023
Havaman andaj : आजचा हवामान अंदाज - 9 सप्टेंबर 2023
आज कोकनासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
Havaman andaj : आज कोकनासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा. रायसेन, पेंद्रा रोड, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र आहे.
राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने शुक्रवारी कोकणात दमदार पाऊस कोसळला. मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर मुसळाधर तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.
आज कोकणात सर्वदूर तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे, तर खानदेश आणि विदर्भात विजांसह पावसाची इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
- पालघर
- ठाणे
- मुंबई
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- जळगाव
- नाशिक
- नगर
- पुणे
- सातारा
विजांसह पावसाचा इशारा :
- नंदूरबार
- धुळे
- बुलढाणा
- अकोला
- अमरावती
- वाशीम
- यवतमाळ
- वर्धा
- नागपूर
- भंडारा
- गोंदिया
- चंद्रपूर
- गडचिरोली
source : agrowon