Bajarbhav : शेतमालाचे दररोजचे बाजारभाव घरबसल्या तुमच्या मोबाईलवर कसे पाहायचे?
28-08-2023
![Bajarbhav : शेतमालाचे दररोजचे बाजारभाव घरबसल्या तुमच्या मोबाईलवर कसे पाहायचे?](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1693374269882.webp&w=3840&q=75)
Bajarbhav : शेतमालाचे दररोजचे बाजारभाव घरबसल्या तुमच्या मोबाईलवर कसे पाहायचे?
हंगाम खरीप असो की रब्बी, पीक काढून घरात आणलं की त्याला मार्केटमध्ये नेमका किती भाव मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारतात. आता शेतकऱ्यांना हा भाव जाणून घेण्यासाठी मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला फोनही करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या फोनवर तुमच्या शेजारील मार्केटमध्ये शेतमालाची काय दरानं खरेदी केली जात आहे, ते पाहू शकता. इथं तुम्ही केवळ तुमच्या भागातीलच नाही, तर तुमच्या शेतमालाला राज्यातील कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळतोय, तेही पाहू शकता.
पण, मग हे दर कसे आणि कुठे पाहायचे याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Bajarbhav : असे पाहा शेतमालाचे बाजारभाव
- पिकांचे दररोजचे बाजारभाव(ajache taje bajarbhav) पाहण्याचं ठिकाण म्हणजे कृषीक्रांती (krushikranti.com).
- कृषीक्रांती हि एक अशी वेबसाईट आहे जिथं तुम्हाला राज्यभरातील बाजारपेठांधील पिकांचे बाजारभाव पाहता येतात.
- आता ते पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला krushikranti.com असं सर्च करायचं आहे.
- या वेबसाईटवर खाली तुम्हाला बाजारभाव हा पर्याय दिसेल.
- इथं तुम्हाला बाजारभाव वर क्लिक करायचं आहे.
- बाजारभाव मध्ये तुम्हाला आजचे ताजे बाजारभाव(जिल्हा नुसार) आणि आजचे ताजे बाजारभाव(पीक नुसार) पाहायला मिळतील.
- जर तुम्हाला जिल्ह्यानुसार बाजारभाव पाहायचे असतील तर त्या जिल्ह्यावर क्लिक करा, त्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला किती भाव मिळाला ते तुम्ही पाहू शकता.
- जर तुम्हाला पिकानुसार बाजारभाव पाहायचे असतील तर त्या पिकावर क्लिक करा, त्या पिकाला कोणत्या बाजारसमितीत किती भाव मिळाला ते तुम्ही पाहू शकता.
अशाप्रकारे कृषीक्रांती या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला हवं असलेला जिल्हा, शेतमालाचा प्रकार आणि बाजारसमिती निवडून तिथला बाजारभाव पाहू शकता.
शेतमाल बाजारभाव कसे पाहायचे?
व्हिडिओ स्वरूपात सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
krushikranti.com