राज्यात सध्या कापसाची आवक व दराची स्थिती काय आहे, सविस्तर जाणून घेऊया
30-06-2024
राज्यात सध्या कापसाची आवक व दराची स्थिती काय आहे, सविस्तर जाणून घेऊया
बाजारातील कापसाची आवक घटली आहे मान्सूनचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील लागवडीला सुरूवात केलेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या हंगामातील कापूस दर वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला होता. पण अद्याप कापसाला काही चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उपलब्ध त्या किंमतीमध्ये कापसाची विक्री करावी लागत आहे.
दरम्यान, आज सावनेर, मानवत व हिंगणघाट बाजार समितीमध्ये (Market Yard) सर्वांत जास्त कापसाची आवक झाली होती. तर लोकल, मध्यम व एच-४-मध्यम स्टेपल कापसाची आवक होताना दिसत आहे. मानवत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १ हजार ३०० क्विंटल कापसाची आवक झालेली होती.
तर मानवत बाजार समितीमध्ये ७ हजार ९०० रूपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील राज्यामधील एकूण बाजार समितींतील सर्वोच्च सरासरी दर होता. त्याचबरोबर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज १ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर येथे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल असा सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
अमरावती | - | क्विंटल | 70 | 6700 | 7550 | 7125 |
सावनेर | - | क्विंटल | 850 | 7100 | 7150 | 7150 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 47 | 7200 | 7300 | 7250 |
मानवत | लोकल | क्विंटल | 1300 | 6900 | 7975 | 7900 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1000 | 6000 | 7900 | 6500 |