गाय-म्हैस गाभण राहिली का? आता फक्त १० रुपयांत समजणार!
12-07-2025

शेअर करा
गाय-म्हैस गाभण राहिली का? आता फक्त १० रुपयांत समजणार!
गाय किंवा म्हैस माजावर आली की आपण योग्य वेळेस लावतो. पण बऱ्याच वेळा ती गाभण राहत नाही. आणि आपल्याला ते उशिरा कळतं. तोपर्यंत पुन्हा माज येण्याचा वेळ निघून गेलेला असतो.
यामुळे आपलं दूधाचं उत्पादन थांबतं. कारण गाय-म्हैस गाभण राहिली नाही, तर ती दूध देत नाही.
उपाय काय?
आता केंद्र सरकार आणि सीआयआरबी, हिसार यांनी मिळून "प्रेग डी किट" तयार केली आहे. या किटमुळे फक्त १० रुपयात आपण जनावर गाभण राहिलं आहे की नाही, हे घरबसल्या तपासू शकतो!
ही किट कशी वापरायची?
- गाभण आहे की नाही हे बघण्यासाठी जनावराचं मुत्र घ्यावं.
- ते मुत्र किटवर टाकावं.
- किटचा रंग गडद लाल किंवा जांभळा झाला तर गाभण राहिलंय.
- जर रंग पिवळसर किंवा फिका असेल, तर गाभण राहिलं नाही.
महत्वाच्या सूचना:
- जनावर आजारी असेल, तर रिपोर्ट चुकू शकतो.
- मुत्र २०-३० अंश सेल्सिअस तापमानात असावं, म्हणजेच फार थंड किंवा फार गरम नसावं.
फायदे काय?
- वेळेआधीच माहिती मिळते.
- गाभण नाही राहिलं तर दुसऱ्यांदा मळवता येतं.
- दूध उत्पादन लवकर सुरू करता येतं.
- खर्च कमी होतो, फायदा वाढतो.
शेतकरी बांधवांनो, ही किट लवकरच बाजारात येणार आहे. घरबसल्या, कमी पैशात आणि वेळ वाचवत आपलं जनावर गाभण आहे की नाही ते समजेल!