अवकाळी पाऊस आणि गारपीट असताना आपल्या पिकांचे संरक्षण कसे कराल...?

03-04-2025

अवकाळी पाऊस आणि गारपीट असताना आपल्या पिकांचे संरक्षण कसे कराल...?

अवकाळी पाऊस आणि गारपीट असताना आपल्या पिकांचे संरक्षण कसे कराल...?

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त माहितीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह काही भागांत हलक्या पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

 

हवामान पूर्वानुमान आणि सतर्कता:

 

  • ०३ एप्रिल: बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
  • ०४ एप्रिल: लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग (ताशी ३०-४० कि.मी.) राहण्याची शक्यता आहे.

 

तापमानातील बदल:

 

  • पुढील ३ दिवसांत कमाल तापमान २ ते ४ अंशांनी घटणार असून त्यानंतर हळूहळू वाढ होईल.
  • किमान तापमान पुढील ४-५ दिवसांत २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले:

 

सामान्य मार्गदर्शन:

 

  • पावसाचा व गारपीटीचा अंदाज लक्षात घेऊन काढणी व मळणी केलेल्या धान्याची योग्य प्रकारे सुरक्षित साठवणूक करावी.
  • कापूस पिकाच्या पहाट्या काढून नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंड अळीचा प्रसार कमी होईल.

 

पीक व्यवस्थापन:

 

  • गहू: मळणीसाठी तयार गव्हाची लवकरात लवकर मळणी करावी. शक्य नसल्यास ताडपत्रीचा वापर करून माल सुरक्षित ठेवावा.
  • हळद: काढणी झालेली हळद उघड्यावर न ठेवता सुरक्षित साठवणूक करावी.
  • उन्हाळी भुईमूग: आवश्यकतेनुसार तुषार सिंचन करावे. रसशोषण करणाऱ्या किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निंबोळी अर्क किंवा जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

 

फळबाग व्यवस्थापन:

 

  • केळी: घड लागलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा व पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • आंबा: काढणीस तयार फळांची लवकरात लवकर काढणी करावी. झाडांच्या मुळांजवळ आच्छादन करून जमिनीतील ओलावा टिकवावा.
  • द्राक्ष: काढणी न झालेली फळे तातडीने काढावीत आणि एप्रिल छाटणीसाठी तयारी करावी.

 

भाजीपाला आणि फुलशेती:

 

  • वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याची लवकरात लवकर काढणी करून बाजारात पाठवावी.
  • मिरची, वांगे, भेंडी या पिकांवरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांचा वापर करावा.
  • फुलशेतीमध्ये खुरपणी करून पिकांना तणमुक्त ठेवावे आणि काढणीस तयार असलेली फुले त्वरित विक्रीसाठी पाठवावीत.

 

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती:

 

  • मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • हवामानाच्या बदलाचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.

अवकाळी पाऊस, गारपीट प्रभाव, हवामान अंदाज, पीक संरक्षण, शेतकरी सल्ला, फळबाग व्यवस्थापन, भाजीपाला काढणी, कृषी मार्गदर्शन, तापमान बदल, weather today, awakali paus, rain, weather forecast, pik vyavasthapan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading