मुरघास उत्पादनासाठी योग्य चारा पिकांची निवड कशी करावी..?
21-10-2024
मुरघास उत्पादनासाठी योग्य चारा पिकांची निवड कशी करावी..?
मुरघास खरे तर हि एक आंबवण्याची प्रक्रीया आहे. मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हणतात.
चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतींमध्ये मुरघास हि एक सोपी आणि महत्वाची पद्धत आहे, त्यामुळे पारंपारिक पद्धतीमध्ये चारा वाळऊन साठवला जातो.
परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. पण, मुरघास पद्धतीने साठवलेल्या चाऱ्यामधील हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.
मुरघास करण्यासाठी पिकांची निवड कशी करावी..?
- चांगल्या प्रकारचा मुरघास तयार करण्याकरीता एकदल चारा पिके द्विदल चारा पिकापेक्षा अतिशय उत्तम आहेत.
- कारण ज्या पिकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्या पिकांपासून अतिशय उत्कृष्ट मुरघास तयार होतो. यामुळे तृणधान्य पिके योग्य असतात.
- त्यामध्ये मका आणि ज्वारीसारख्या पिकापासून उत्कृष्ट मुरघास तयार होतो.
- याबरोबर बाजरी, संकरीत नेपियर, ओट या एकदलवर्गीय पिकापासून सुद्धा चांगला मुरघास तयार करता येतो.
- द्विदल चारा पिकांपासूनही मुरघास तयार करता येतो पण त्यासाठी या पिकासोबत ५० टक्के एकदलवर्गीय पिक साठवावे लागते.
- सेच गुळाचा योग्य वापर आवश्यक असतो.
- योग्य मुरघास तयार करण्यासाठी चारा पिके ५० टक्के फुलोरा अवस्थेत असताना कापणी करावी लागते.
काय आहेत मुरघासाचे फायदे:
- हिरव्या चाऱ्याचा तुटवडा उन्हाळ्यात भासतो त्यावेळी मुरघास उत्तम पर्याय ठरतो.
- हिरव्या चाऱ्यासारखा गुणवत्ता असणारा चारा म्हणजे मुरघास.
- दुभत्या जनावरांना उत्पादन सातत्य राखण्यासाठी तो उपयोगी ठरतो.
- याद्वारे हिरवा चारा चांगल्या अवस्थेत दीर्घकाळ टिकवून ठेवणे शक्य होते.
- गवतासारख्या निकृष्ठ वनस्पतीपासुनही चांगल्या प्रकारे मुरघास तयार होतो.