शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कापूस-सोयाबीनसाठी भावांतर योजना पुन्हा सुरू…?
12-03-2025

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, कापूस-सोयाबीनसाठी भावांतर योजना पुन्हा सुरू…?
कापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २०२३-२४ च्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातील उलथापालथीमुळे कापूस व सोयाबीनच्या दरात घट झाली. त्यामुळे राज्य सरकारने भावांतर भरपाई योजना जाहीर करत, दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची गरज:
सद्याच्या हंगामात देखील या दोन्ही पिकांचे दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे भावांतर अनुदान योजना पुनरुज्जीवित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
सोयाबीन बाजारभाव (रु./क्विंटल):
गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे बाजारभाव सतत बदलत आहेत. बाजारातील घसरण लक्षात घेतल्यास, शेतकऱ्यांसाठी सध्याचा कालावधी अत्यंत कठीण आहे.
(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav
भावांतर योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा:
- दरांमध्ये स्थिरता – भावांतर भरपाई मिळाल्यास शेतमाल विक्रीवर परिणाम होणार नाही.
- शेतीला आर्थिक पाठबळ – पीक खर्च भरून निघेल, त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाहीत.
- नफा आणि उत्पादन क्षमता वाढ – योजनेचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यांचा शेतीवरील विश्वास वाढेल.
शेतीसाठी शासकीय धोरण महत्त्वाचे:
शेतमालाच्या किमान आधारभूत किंमती (MSP) आणि बाजारभावातील तफावत भरून काढण्यासाठी भावांतर योजना प्रभावी ठरू शकते. भविष्यात अशा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
हे पण पहा:- शेती संरक्षणासाठी मोठी घोषणा, सोलर कुंपण योजनेसाठी आता संपूर्ण अनुदान…!