बियाणे पेरणीपूर्वी जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया कशी कराल..?

24-10-2024

बियाणे पेरणीपूर्वी जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया कशी कराल..?

बियाणे पेरणीपूर्वी जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया कशी कराल..?

रबीचा हंगाम सूरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रबीचे पीक पेरण्याची हालचाल सुरू झालेली आहे. कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे अत्यंत महत्वाचे पीक असून विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी याची लागवड करतात.

हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, जसे लागवडीसाठी सूधारीत वाणांची निवड, खतांच्या योग्य मात्रांचा वापर, वेळोवेळी आंतरमशागत, सिंचन इ. बाबींचा योग्य अवलंब करतात. 

याबरोबर हरभरा पेरणीपूर्वी जैविक खतांची बीज प्रक्रिया केल्यास कमी खर्चात उत्पादनात भर पडण्यास मदत होते.

जिवाणू खते वापरण्याची पध्दत:

  • एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.
  • वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात २०० ते २५० ग्रॅम जिवाणू खत मिसळावे.
  • १० ते १२ किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लॉस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
  • शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाणास चोळावे.
  • बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे (रायझोबियम) स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी) यांचे मिश्रण करून बियाणास लावावे.
  • प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे.
  • प्रक्रिया केल्यानंतर बियाणे २४ तासाच्या आत पेरावे.

जिवाणू खते वापरतांना घ्यावयाची काळजी:

  • जिवाणू खतांचे पाकीट सावलीत ठेवावे, सूर्यप्रकाश व उष्णता यापासून त्यांचे संरक्षण करावे.
  • जिवाणू खत हे रासायनिक खत नाही म्हणून जिवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये.
  • बुरशीनाशके किंवा किटकनाशके लावावयाची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जिवाणू खत लावावे.
  • जिवाणू खतांच्या पाकीटावर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापुर्वीच ती खते वापरावीत.
  • जिवाणू खत पाकीटावर नमुद केलेल्या विशिष्ट पिकाकरीताच वापरावे अन्यथा त्याचा समाधानकारक परिणाम आढळून येत नाही.
     

हरभरा पेरणी, रबी हंगाम, कडधान्य लागवड, जैविक प्रक्रिया, जिवाणू खत, हरभरा उत्पादन, नत्र उपलब्ध, खतांचा वापर, पीएसबी मिश्रण, बीज प्रक्रिया, बियाणे, शेतकरी, seeds, rabbi, khat

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading