शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लसुन दरात मोठी वाढ
06-02-2024
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लसुन दरात मोठी वाढ
लसूण उत्पादक शेतकरी मालामाल!लसणाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किलोला किती मिळतोय भाव?
लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वर बाजारात लसणाचा दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. अनेक भागात लसूण पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. या महिन्यात किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. लसूणही महाग झाला आहे. लसणाचा दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे? दर कमी होणार का? याबाबतची माहिती घेऊया.
लसणाच्या दरात वाढीची कारणे काय?
गेल्या काही आठवड्यात लसणाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. भुवनेश्वर बाजारात लसणाचा दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
लसणाचे दर कमी होतील का?
मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड होते. खराब हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. लसणाचे पीक बाजारात आल्यावर लसणाचे दर कमी होतील असा अंदाज आहे. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल.फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. तर भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते.