कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये : सहा लोकप्रिय वाण
12-06-2024
कापसाच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये : सहा लोकप्रिय वाण
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये बीटी कापूसची विविध जातींची माहिती खासगी उत्पादन क्षमतेसाठी महत्त्वाची आहे. या आलेल्या विभिन्न जातींमध्ये समाविष्ट आहेत: राशी 659 BG II, जादू, कब्बडी, सुपरकोट, यु.एस. 7067, आणि अजित 155. प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये आणि त्यांची लागवड कालावधी तपासण्यास उपयुक्त आहे. या कापूसच्या जातींमध्ये मुख्य विशेषते समाविष्ट आहेत: बोंडांचे वजन, वाणसंपूर्णता, आणि रोग प्रतिकारक क्षमता. ह्या माहितीमध्ये दिलेल्या विवरणांचा वापर करून, निवडलेल्या कापूस जातीची लागवड करण्याची योजना करा आणि उत्तम उत्पादन सुनिश्चित करा.
1. राशी 659 BG II (राशी सीईड्स)
जमीन - मध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी - 145 - 160 दिवस.
वैशिष्ट्य -
1. वजनदार आणि मोठ्या आकाराचे कापूस बोंड
2. कापूस वेचणीस सोपा
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5 ते 5.5 ग्राम
4. लवकर येणारी जात.
2. जादू (कावेरी सीड्स)
जमीन - हलकी ते माधयम
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 155 - 170 दिवस.
वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस प्रतिकारक
2. दाट लागवडीसाठी चांगला वाण (4 * 1.5 फूट)
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 6 ते 6.5 ग्राम (मध्यम मोठे बोंड)
4. प्रत्येक फळफांदीस 12 ते 14 बोंडे लागण्याची क्षमता, भरपूर पुनर्बहर क्षमता.
5. कापूस वेचणीस सोपा.
3. कब्बडी (तुलसी सीड्स)
जमीन - सर्व प्रकारच्या जमिनी मध्ये लागवड करू शकता.
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 160 - 180 दिवस.
वैशिष्ट्य -
1. अधिक उत्पादन क्षमता,मोठा बोंडाचा आकार
2. कापूस वेचणीस सोपा
3. जास्तीत जास्त 5 पाकळी बोंड
4. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
5. फरदडी साठी उपयुक्त वाण.
4. सुपरकोट (प्रभात सीड्स)
जमीन - माध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 160 - 170 दिवस.
वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक
2. कापूस वेचणीस सोपा
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
4. बोंडे लागण्याची संख्या चांगली.
5. यु.एस. 7067 ( यु.एस. ऍग्रीसीड्स )
जमीन - माध्यम ते भारी
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी - 155 - 160 दिवस.
वैशिष्ट्य -
1. रोग प्रतिकारक चांगली
2. दाट लागवडी योग्य वाण (3 * 2 फूट )
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम
4. मोठी बोंडे, आकार गोल.
5. लवकर येणारे वाण
6. अजित 155 (अजित सीईड्स)
जमीन - हलकी ते माधयम
सिंचन - कोरडवाहू / बागायत
पिकाचा कालावधी 145 - 160 दिवस.
वैशिष्ट्य -
1. रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक
2. पाण्याचा ताण सहन करणारे वाण
3. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5 ते 5.5 ग्राम
4. बोंडे लागण्याची संख्या चांगली.