तुमच्या जमिनीची मोजणी करा ऑनलाईन तुमच्या मोबाईवर
21-03-2023
तुमच्या जमिनीची मोजणी करा ऑनलाईन तुमच्या मोबाईवर
अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या बांधावरून वाद निर्माण अशा वेळेस जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. परंतु आपण मोबाईलच्या माध्यमातून काही मिनिटामध्ये जमिनीची मोजणी करू शकता. मोबाईलवरून केलेली मोजणी हि १००% अचूक असेल असे नाही. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
मोबाईल वरून मोजणी करून आपल्याला एक अंदाज येईल कि आपले क्षेत्र कमी आहे कि जास्त. हि मोजणी आपण गुगल च्या मदतीने करणार आहोत. म्हणजेच आपल्याला मोबाईलमध्ये Google Earth हे App घ्यावे लागेल.
मोबाईल वरून जमिनीची मोजणी कशी करावी?
- मोबाईल वरून जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण मोबाईमध्ये प्ले स्टोर वरून Google Earth हे App घ्यावे.
- त्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे आहे. आणि मोबाईल मधील Location सुरु करा.
- खालीच्या कोपऱ्यात जे माणसाच्या आकृतीच्या चिन्हाचे बटन आहे त्याच्या वरती एक लोकेशनचं गोल बटन आहे त्या गोल बटनावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही ज्याठिकाणी आहात त्याठिकाणाचा नकाशा ओपन होईल.
- तुम्हाला ज्या प्लॉटची/ शेतजमिनीची मोजणी करायची आहे. त्या प्लॉटचा नकाशा ओपन करा.(आपण त्या प्लॉटच्या ठिकाणी उभे असाल तर अजून सोपे होईल.)
- त्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात जे अकाउंट Account चा logo आहे त्याच्या डावीकडील आयकॉन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या प्लॉट ची मोजणी करायची आहे. त्या प्लॉटच्या बांधावर गोल पाँईट ठेवा आणि Add Point वर क्लिक करा.
- नंतर प्लॉटचा दुसरा कोपरा त्यावर गोल पाँईट घेऊन जा व पुन्हा Add Point वर क्लिक करा.
- असेच प्लॉटच्या सर्व बाजूने पूर्ण करा व पहिल्या पाँईट ला शेवटचा पाँईट जोडा आणि close point वर क्लिक करा.
- डाव्या बाजूला प्लॉटचे क्षेत्र मीटर मध्ये दाखवले जाईल, त्याच्या खाली तुम्हाला Area हा पर्याय दिसेल.
- त्यामध्ये तुम्हाला Ac पर्याय निवडा म्हणजे आपले क्षेत्र किती एकर आहे. हे तुम्हाला पाहायला मिळेल.
source : farmerscheme