बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्याचे आवाहन

01-05-2024

बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्याचे आवाहन

बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्याचे आवाहन 

आगामी खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत बनावट बियाणे विकले जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाने पथकांची नेमणूक करावी. तसेच जिल्ह्यातील विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावेत. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सोयाबीन आणि कापूस पिकांवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यांची उत्पादकता वाढेल अशा पिकांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, की आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता.

यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी त्यांना सांभाळून ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत.

याबरोबरच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देण्यात यावी. चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी. नवीन संशोधनाची माहिती देऊन शेतकऱ्यांना शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून देण्यात यावा.

पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तवेळी मदत मिळण्यास मदत होते. यावर्षी २३४ कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यातून ३३२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

पीक कर्ज वितरणासाठी विशेष प्रयत्न करा

हंगामात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक कर्ज महत्त्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे. बँकांनी कर्ज प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी, असे निर्देशही डॉ. किरण पाटील यांनी दिले.

आगामी खरिपातील प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)

  • सोयाबीन ४ लाख १३४१५
  • कपाशी १ लाख ९५ हजार
  • ज्वारी ४८१५
  • मका २२३४५
  • तूर ८२ हजार ७८५
  • मूग ९९९७
  • उडीद ८२७८
  • तीळ ४४०
  • एकूण ७३९७२०

 

seeds, seed scam, duplicate seeds

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading