सीसीआयने सुरू केली कापूस खरेदी, कमी आर्द्रतेवरच मिळणार हमीभाव..!

12-11-2024

सीसीआयने सुरू केली कापूस खरेदी, कमी आर्द्रतेवरच मिळणार हमीभाव..!

सीसीआयने सुरू केली कापूस खरेदी, कमी आर्द्रतेवरच मिळणार हमीभाव..!

यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. 

अखेर जिल्ह्यामध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआयचे केंद्र जळगाव शहरात सुरू करण्यात आले आहे.

शिवाजीनगर भागामधील शांती एक्झिम येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीसीआयचे केंद्र प्रमुख के. पी. मीना, अंशू प्रिया, बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे, बाजार अधीक्षक विकास सूर्यवंशी, पूनमचंद राठोड, जितेंद्र खलसे आदी उपस्थित होते.

तसेच, जिल्ह्यामधील  इतर तालुक्यांमध्येही सीसीआयकडून खरेदी केंद्र सुरू करण्याचीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तरच मिळणार हमीभाव...

सीसीआयच्या केंद्रावर माल विक्रीसाठी आणताना हमीभावासाठी काही निकष निश्चित करुन देण्यात आले आहेत. आर्द्रतेचे प्रमाण जर ८ टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच त्या शेतकऱ्यांना ७ हजार ५२१ रुपयांचा हमीभाव देण्यात येणार आहे.

१२ टक्क्यांपर्यंतची आर्द्रता राहिल्यास त्या शेतकऱ्यांना ७ हजार १२१ रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्तीची आर्द्रता राहिल्यास त्यात अजून दर कमी होण्याची शक्यता आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक..?

सीसीआयकडे माल विक्री करताना शेतकऱ्यांना कापूस पेरा असलेला सात बाराचा उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत.

सीसीआय कापूस, कापूस खरेदी, कापूस बाजारभाव, कापूस विक्री, शेतकरी, बाजार दर, मंडी खरेदी, कापूस गुणवत्ता, कृषी सहाय्य, आर्द्रता स्तर, आवश्यक कागदपत्रे, कृषी बाजार, जळगाव कापूस, सीसीआय केंद्र, cci, shetkari, bajarbhav, kapus rate, cotton, नमी, कापूस नमी

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading