मिरची लागवड, हवामान आणि व्यवस्थापन…
17-07-2024
मिरची लागवड, हवामान आणि व्यवस्थापन…
बाजारात हिरव्या मिरच्यांची वर्षभर मागणी असतेच. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड होत असते. महाराष्ट्रातील मिरची लागवड खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. मिरची मध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मिरचीचा संतुलित आहारात समावेश केला जातो. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरची महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो.
जमीन:
मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये मिरचीचे पीक अतिशय चांगले येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.
हवामान:
मिरची पिकाची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते व उत्पादनही चांगलेच मिळते. या पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे मिरचीच्या फुलांची गळ जास्त होते. मिरचीला 40 इंचा पेक्षा कमी पाऊस असणे आवश्यक असते. मिरचीच्या झाडांची व फळांची वाढ 25 ते 30 डिग्री सेल्सिअस अशा तापमानामध्ये चांगली होते. तापमानामधील तफावतीमुळे फुले आणि फळांची गळ मोठ्या प्रमाणावर होते आणि उत्पादनामध्ये घट येते. बियांची उगवण 18 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली येते.
मिरची लागवड टिप्स :
- प्रती हेक्टरी एक ते दीड किलो मिरचीचे बियाणे वापरावे.
- एप्रिल, मे महिन्यामध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी.
- हेक्टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत टाकावे लागवडीसाठी जमीन तयार करावी.
- सव्वा ते दीड फुटाच्या अंतराने नागमोडी पद्धतीने मल्चिंग छिद्रे पाडून की मिरची लागवड करणे आवश्यक आहे.
- रोपांची लागवड ही साडेसात ते आठ हजार रुपये एकरी या हिशोबाने तुम्हाला लागत असते.
- अगोदर बेसल डोस टाकायचा आहे.
- त्यानंतर मल्चिंग करायचे आहे.
- नंतर त्या नागमोडी अंतर आणि तुम्ही सव्वा दीड फुटावर छिद्रे पाडून लागवड करायची आहे.
- शक्यतो नर्सरीमधील निरोगी रोपांची लागवड करावी जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि आपल्याला चांगले पोषक रोप मिळते.
- निगराणी करताना फवारणी बाकीच्या गोष्टी त्याच्या मध्ये आपला कुठलाही वेळ जात नाही.
लागवडीमध्ये किती अंतर असावे:
- मिरचीच्या रोपांच्या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी.
- त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तण रहीत ठेवावे.
- खरीप नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना भर दयावी.
- बागायती पिकांच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर 2 महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.
खते:
- वेळेत खत दिल्यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते.
- मिरचीच्या कोरडवाहू पिकासाठी प्रती हेक्टरी 50 किलो, नत्र 50 किलो स्फूरद आणि ओलिताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो, नत्र 50 किलो स्फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
- यापैकी स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्या वेळीच द्यावीत.
- नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्दतीने द्यावी.
पाणी व्यवस्थापन:
- मिरची बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणेच पाणी द्यावे.
- झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो.
- या काळात 1 दिवसा आड पाणी द्यावे.
- त्यानंतर 5 दिवसांच्या किंवा एक आठवडयाच्या अंतराने पाणी दयावे हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये 6 ते 8 दिवसांच्या अंतराळाने पिकाला पाणी दयावे.