21 ते 28 मार्च दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी अंदाज - पंजाबराव डख
21-03-2024
21 ते 28 मार्च दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी अंदाज - पंजाबराव डख
आज 21 मार्च 2023,
21 ते 28 मार्च दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहील
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रात तसेच राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे, त्यानंतर 29, 30 आणि 31 मार्चला कोकण किनारपट्टीवर तसेच सह्याद्रीच्या रांगांमद्धे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. हा पाऊस थेट गोव्यापासून ते नंदुरबार पर्यंत असणार आहे. तसेच नाशिक, इगतपुरी या भागात देखील पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये ढगाळ वातावरणाबरोबरच उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे. हा पाऊस कोकण किनारपट्टी, सह्याद्रीच्या रांगा व पुण्यापर्यंत राहणार आहे, असे पंजाब डख यांनी सांगितले.
एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे, आणि हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभरात असणार आहे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले, त्याचा सविस्तर अंदाज आपण तुम्हाला पुढे देणार आहोत. त्यासाठी आपल्या शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुपला जोडले जा. 👉 शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुप
यू-ट्यूब व्हिडीओ 👇
https://youtu.be/0QDUiHdq7uc?si=CFpV2rZFduJ8FE3W