Weather News: महाराष्ट्रात थंडीची चाहूल; मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला.
30-10-2023
Weather News: महाराष्ट्रात थंडीची चाहूल; मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला.
महाराष्ट्रात गारठा वाढू लागताच, कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढू लागली आहे. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पहाटे गारठा जाणवू लागला असून, किमान तापमानात हळूहळू घट होऊन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात ऑक्टोबर हीट न चा चटका कमी झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुपारचे तापमान ३३ अंशाच्या खाली आले आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३५ अंशाच्या खाली आले आहे.
किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आहे.
पहाटे गारठा जाणवू लागला असून, किमान तापमानात हळूहळू घट होऊन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
दिनांक २८ ऑक्टोबर शनिवारी रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१३.६), नांदेड ३२.८ (१७.६), परभणी ३३.४ (१६.६), अकोला ३४.७ (१७.०), पुणे ३२.३ (१४.५),वर्धा ३२.१(१६.८), वाशीम ३४.४(१५.०) यवतमाळ ३४.० (१५.५),जळगाव ३४.४ (११.६), कोल्हापूर ३१.९ (१९.४), महाबळेश्वर २७.१ (१६.१), नाशिक ३२.३ (१४.८), निफाड ३२.८ (१३.५), सांगली ३३.१ (१८.८), सोलापूर ३६.० (१८.०), सांताक्रूझ ३६.४ (२१.५), डहाणू ३४.१ (२१.०), रत्नागिरी ३६.४(२१.६), ब्रह्मपूरी ३४.७ (१८.०), चंद्रपूर ३१.६(१६.०), गडचिरोली ३१.४ (१६.२), गोंदिया ३२.१(१६.२), नागपूर ३२.२ (१६.२), सातारा ३३.० (१६.०), अमरावती ३२.६ (१६.३), बुलढाणा ३२.५ (१६.७)