राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना…
27-06-2024
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना…
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर राबविण्यात येणाऱ्या बाबी.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या हेतूने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृषी योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबवण्यात येत आहेत.
सन २०२४-२५ मध्ये योजने अंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी १२ जून ते ३० जून, २०२४
- नॅनो युरिया सोयाबीन
- नॅनो डीएपी सोयाबीन
- नॅनो युरिया कापूस
- नॅनो डीएपी कापूस
- बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
- कापूस साठवणूक बॅग
या निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १२ जुन २०२४ पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात येत आहे.