Land report : आता 2 मिनिटात होणार जमिनीची मोजणी, ते पण मोबाईलवर कसं ते पहा
24-05-2024
Land report : आता 2 मिनिटात होणार जमिनीची मोजणी, ते पण मोबाईलवर कसं ते पहा
Land report : शेतकरी बांधवांना अनेकदा आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असते. तसेच सामान्य जनतेला आपल्या प्लॉटच नेमकं क्षेत्रफळ किती आहे हे जाणून घेण्यासाठी मोजणी करायची असते. शेतकऱ्यांना, शेती पिकांच्या पेरणीसाठी तसेच इतर अन्य कामांसाठी आपल्या जमिनीची मोजणी करायची असते. जमिनीचं परफेक्ट क्षेत्रफळ जर माहिती असेल तर शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने आपली शेतीची कामे करता येतात.
land counting : जमीन किती आहे याची जर शेतकऱ्यांना कल्पना असली तर त्यानुसार पेरणीसाठी बियाणे, खत यांची पूर्तता करण्यास मोठी मदत होत असते. तसेच जर जमिनीची मशागत करायची असेल आणि भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर लावला असेल तर भाडे देताना देखील नेमकी जमीन किती आहे याबाबत शेतकऱ्यांना माहिती आवश्यक असते.
प्लॉट धारक व्यक्तींना देखील आपल्या प्लॉटचा नेमकं क्षेत्रफळ किती आहे त्यानुसार घर बांधण्यासाठी किंवा इतरांनी कामांसाठी नियोजन करताना मदत होते. एकंदरीत जमिनीची आणि प्लॉटची मोजणी शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी अतिआवश्यक बाब आहे. मात्र आता इथे प्रश्न निर्माण होतो की याची मोजणी नेमकी कशी करायची. शासकीय मोजणी व्यतिरिक्त मोजणीसाठी अन्य काही साधने उपलब्ध आहेत का? तर याचे उत्तर आहे हो.
शासकीय जमीन मोजणी व्यतिरिक्त देखील जमीन मोजणी केली जाऊ शकते ती देखील अगदी दोन मिनिटात. आता तुम्ही म्हणत असाल हे कसं शक्य आहे तर यासाठी मोबाईलमध्ये वेगवेगळे एप्लीकेशन असतात. दरम्यान आज आपण एका एप्लीकेशन चा उपयोग करून जमिनीची किंवा प्लॉटची मोजणी कशी केली जाते याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या एप्लीकेशनने मोजणी करायची?
जर आपणास जमिनीची किंवा प्लॉटची मोजणी करायची असेल तर
- सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये लँड रिपोर्ट नावाचे एक एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.
- यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन landreport.in असे सर्च करायचे आहे. यानंतर जे अँप्लिकेशन ओपन होईल ते अप्लिकेशन आपण डाउनलोड करायचे आहे. किंवा आपण https://play.google.com/store/apps/details?id=in.landreport या लिंक वर जाऊन आपण हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
- एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर एप्लीकेशन ओपन करायचे आहे.
- अँप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपणास भाषा निवडण्याचा ऑप्शन येईल.
- हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तीन भाषा पैकी आपणास आपल्या सोयीनुसार भाषेची निवड करायची आहे.
- आपण मराठी भाषा निवडू शकता.
- त्यानंतर आपल्यापुढे वेगवेगळे पर्याय दिसतील यापैकी नकाशावरून जमीन मोजणी करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला मेजर एरिया (Measure Area) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला आपलं लोकेशन दिसण्यास सुरुवात होईल.
- या ठिकाणी आपली जमीन कुठे आहे हे शोधायचे आहे.
- त्यानंतर जेवढी जमीन मोजायची आहे तेवढी जागा त्या ठिकाणी सिलेक्ट करायची.
- यानंतर त्या ठिकाणी एरिया म्हणून एक पर्याय असेल त्यावर क्लिक करून आपण जमीन नेमकी एकर, हेक्टर की स्क्वेअर फुट मध्ये मोजायचे आहे हे सिलेक्ट करू शकणार आहात.
- एवढे केले की आपल्या जमिनीचे प्लॉटचे क्षेत्रफळ आपल्या पुढे ओपन होईल.
याप्रमाणे आपण जमिनीची आणि प्लॉटची मोजणी या ठिकाणी करू शकणार आहात. हे एप्लीकेशन निशुल्क प्ले स्टोअरवर उपलब्ध असून यासाठी कोणताच चार्ज लागत नाही. तसेच हे एप्लीकेशन वापरण्यास देखील अधिक सोयीचे आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे. यामुळे या एप्लीकेशनचा उपयोग करून आपण दोन मिनिटात घरबसल्या जमिनीची मोजणी करू शकणार आहात.
अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी https://wa.link/e3bzf0 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.