शेतकऱ्यांना मिळणार अनुदान! सरकारचा मोठा निर्णय
25-07-2025

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान – सरकारचा मोठा निर्णय:
फेब्रुवारी ते मे २०२५ या काळात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.
३४ जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख शेतकऱ्यांना मदत:
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, नांदेड, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, चंद्रपूर अशा प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रमुख विभागानुसार मंजूर केलेले निधी:
नागपूर विभाग: ५० हजार शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी रुपये
अमरावती विभाग: ५५ हजार शेतकऱ्यांसाठी ६६ कोटी रुपये
छत्रपती संभाजीनगर: ६७ हजार शेतकऱ्यांसाठी ६० कोटी रुपये
पुणे विभाग: १ लाख शेतकऱ्यांसाठी ८१ कोटी रुपये
कोकण विभाग: १३ हजार शेतकऱ्यांसाठी ९ कोटी रुपये
नाशिक विभाग: १ लाख शेतकऱ्यांसाठी ८५ कोटी रुपये
अनुदानात कपात – शेतकरी नाराज:
मात्र, सरकारने यावेळी जुन्या दरानुसारच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मदत मिळणार आहे आणि यावर अनेक शेतकरी नाराज आहेत.
डायरेक्ट खात्यात पैसे – केवायसी गरजेची:
शेतकऱ्यांना हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने मिळतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) पूर्ण केलेली असावी.