मराठवाड्यात अवकाळीमुळे सुमारे ६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
23-04-2024
मराठवाड्यात अवकाळीमुळे सुमारे ६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात 9 ते 14 एप्रिल दरम्यान पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे 114 गावांतील 3,223 शेतकरी प्रभावित झाले असून मराठवाड्यातील 1विभागातील १ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ६ हजार २५७ हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे.
मराठवाडा येथे 9 ते 14 एप्रिलपर्यंत पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या पाच दिवसांच्या आवकाळीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली. वीज पाडून १० जण जखमी झाले तर १० जणांचा मृत्यू झाला होता. लहान, मोठे, ओढकाम करणारे असे एकूण १५२ पशूधन दगावले होते.
अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 237 हेक्टर, जालना 990 हेक्टर, परभणी 539 हेक्टर, हिंगोली 330 हेक्टर, नांदेड 820 हेक्टर, बीड 1693 हेक्टर, लातूर 324 हेक्टर आणि धाराशिव 321 हेक्टरमधील बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले होते. अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याचा फटका ११४ गावांतील ३ हजार २०० शेतकऱ्यांना बसला.
त्यांचे जवळपास १ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत वीज पडून १४ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. लहानमोठी २७३ जनावरे दगावली आहेत. तर ५४४ घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातील एकूण ५९५ गावे बाधित झाली असून १२ हजार ३५० शेतकऱ्यांचे एकूण ६ हजार २५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्हाला बसला आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.