सीताफळ लागवड आणि माहिती
27-02-2023
सीताफळ लागवड आणि माहिती
सीताफळ (Custard Apple) हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापाऱ्यांनी ते आशियामध्ये आणले. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता. हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. यात काळ्या रंगाच्या बिया असतात. फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की कच्चे तोडून पिकायला ठेवतात. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.
प्रस्तावना
कोरडवाहू फळझाडांमध्ये सिताफळ हेक्टरी महत्वाचे फळपिक असून त्याची लागवड प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही एक आजच्या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्या गरीबांचा रानमेवा म्हणून वरदायी ठरलेले आहे.
सिताफळाची लागवड प्रामुख्याने आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश व बिहार राज्यात केली जाते. महाराष्ट्रामध्ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्याची सिताफळे फारच स्वादिष्ट लागतात. अशा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो.
मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्हे आणि खंडाळा फलटण तालुक्यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्वी लागवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे. महाराष्ट्रात सन 1989-90 पर्यंत कोरडवाहू फळझाडाखाली एकूण 242100 हेक्टर क्षेत्र असताना त्यापैकी एकटया सिताफळाखाली 2800 हेक्टर क्षेत्र यशस्वी लागवडीची ग्वाही देणारे ठरले आहे.
सन 1990 – 91 पासून सुरु झालेल्या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्या लागवडीस सिताफळाचा समावचेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सिताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. महाराष्ट्रात सन 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सिताफळाची यशस्वी लागवड 25906 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली आहे.
सिताफळ हेक्टरी अतिशय काटक फळझाड असून त्याचे लागवडीकडे अद्यापही शास्त्रीय दृष्टीने लक्ष देण्यात आलेले नाही. सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्ये कुंपणाच्या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते. त्याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर उताराच्या जमिनी अशा वेगवेगळया प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते.
सीताफळ लागवडीसाठी उपयुक्त हवामान
महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. अत्यंत कोरडया रखरखीत व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्या हवामानापर्यंतच्या प्रदेशात सिताफळ वाढते. मात्र उष्ण व कोरडया हवामानातील सिताफळे चविला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. कोकणासारख्या जास्त दमटपणा असलेल्या भागाताही हे झाड वाढते. पण अशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतात.
आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्ये नेहमी हिरवेागर राहते. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये डिसेंबर ते फेब्रूवारी या काळात त्याची पान गळती होऊन झाडे विश्रांती घेतात. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही. थंड हवामानामध्ये फळे घट्ट व टणक राहून पिकत नाहीत. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. सिताफळाचे झाड अवर्षणाला उत्तम प्रतिसाद देत असले तरी अति-अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते. साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी 500 ते 750 मिमि पाऊस आवश्यक असतो.
सीताफळ लागवडीसाठी उपयुक्त जमीन
सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्त भागासाठी शिफारस केली असल्यामुळे हेक्टरी फळझाड कोणत्याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्यंत हलक्या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्तृत प्रकारच्या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्कलीयुक्त जमिनी या फळझाडाला अयोग्य असतात.
रानचा मेवा म्हणून ओळख असलेल्या बीडचे सीताफळ या मानांकनाने जगभर निर्यात करता येणार आहे. बीड जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत कमी पाऊस पडतो. पाऊस कमी होत असला तरी या कमी पावसामुळे बीड जिल्ह्यात सीताफळ या पिकाला वेगळे वैशिष्ठ्य दिली आहेत. बीड जिल्ह्यातून बालाघाट डोंगररांगा पसरलेल्या आहेत
कृष्ण पांडुरंग बडे ( bsc agriculture )