महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट, हवामान विभागाचा इशारा...
30-08-2024
![महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट, हवामान विभागाचा इशारा...](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1724999985750.webp&w=3840&q=75)
महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट, हवामान विभागाचा इशारा...
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. व त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा जोर सुरू आहे. त्यामध्ये यंदा गुजरातमध्ये अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) अरबी समुद्रावर येऊन शुक्रवारी (३० ऑगस्ट) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.
त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे. परंतू येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता देण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याबरोबर विदर्भामधील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला असून. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज बघूनच पिकांचे नियोजन करावे उघडीप असतानाच पिकांना फवारणी करावी.