मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार प्रोत्साहन लाभ…

13-09-2024

मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार प्रोत्साहन लाभ…

मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार प्रोत्साहन लाभ…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे. 

पण, त्याआधीच ८ हजार २७९ मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना लाभ हा देता येत नव्हता. पण आता या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळणार आहे.

१८ ते २६ सप्टेंबरदरम्यान संबंधितांना बँकांकडे वारसाची नोंद करता येईल. राज्य सरकारने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. त्या योजने अंतर्गत हा लाभ मिळणार आहे.

१८ सप्टेंबरपर्यंत मोहिमेला मुदतवाढ:

  • अशा शेतकऱ्यांसाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली.
  • या योजनेत १० सप्टेंबर पर्यंत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या मोहिमेला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी लाभ, वारसा नोंद, आधार प्रमाणीकरण, कर्जमुक्ती योजना, प्रोत्साहन लाभ, शेतकरी वारस, कर्जफेड मोहीम, आधार मुदतवाढ, पीक कर्ज, कर्ज परतफेड, शेतकरी योजना, अल्प मुदत, महात्मा फुले, शेतकरी लाभ, रक्कम, yojna, sarkari yojna, anudan, सरकारी अनुदान, शेतकरी

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading