धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

02-01-2025

धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

शासकीय खरेदी केंद्रावर धान व भरडधान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ होती. 

मात्र, अनेक शेतकरी विविध कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी नोंदणी मुदतवाढीची मागणी केली होती.

अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि आमदार राजू कारेमोरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीची मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाच्या खालील दरांवर विक्री करावी लागू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान व भरडधान्य खरेदी प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी संबंधित एजन्सींना याबाबत सूचना दिल्या आहेत. ही मुदतवाढ अंतिम असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून शेतकऱ्यांनी १५ जानेवारी २०२५ च्या आत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धान नोंदणी, भरडधान्य खरेदी, ऑनलाईन प्रक्रिया, नोंदणी मुदत, शासकीय केंद्र, हमीभाव फायदा, शेतकरी नोंदणी, मुदतवाढ घोषणा, खरेदी प्रक्रिया, नागरी पुरवठा, खरेदी, बाजारभाव, dhan kharedi, bajarbhav, last date, paddy registration, हमीभाव

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading