दूध संघाची दिवाळी भेट, रिबेट आणि बोनस देण्याचा निर्णय...

20-10-2024

दूध संघाची दिवाळी भेट, रिबेट आणि बोनस देण्याचा निर्णय...

दूध संघाची दिवाळी भेट, रिबेट आणि बोनस देण्याचा निर्णय...

राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विनाकपात रिबेट आणि कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांनी केली आहे. रिबेट आणि बोनसची १७ कोटी ५० लाखांची रक्कम लवकरच वर्ग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्राथमिक दूध संस्थांच्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर सव्वादोन रुपये व गाय दुधास एक रुपयांचा दुध दर फरक देणार आहे. तसेच सेंटरधारकांच्या दूध उत्पादकांना २ रुपये १५ पैसे व ९० पैसे प्रतिलिटर म्हैस व गायीच्या दुधाला देणार आहोत.

प्रशासकीय खर्च कमी करताना उत्पादक सभासदांना केंद्रबिंदू मानून संघाच्या आर्थिक उलाढालीमधील ८३ टक्के रक्कम दूध उत्पादकांना परताव्याच्या स्वरूपात देत आहोत. संघाची वार्षिक उलाढाल ४५० कोटी रुपयांची आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूधदर फरक, प्राथमिक दूध संस्थांच्या विकास ठेवींवरील व्याज, लाभांश, अनामत रक्कम, दुधाचे १० दिवसांचे बिल आणि कर्मचाऱ्यांचा बोनस यासाठी संघामार्फत १७ कोटी ५० लाख रुपये दिले जाणार आहेत.

दूध संघ, दिवाळी बोनस, रिबेट योजना, दूध दर, शेतकरी समर्थन, प्राथमिक दूध संस्था, बोनस वितरण, दूध उत्पादक, शेतकरी, shetkari , doodh, Diwali

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading