ई-पीक पाहणीची अंतिम तारीख वाढवली!!! पहा नवीन वेळापत्रक | e pik pahani last date update
10-09-2025

ई पीक पाहणी अंतिम तारीख कोणती ? | e pik pahani last date update
राज्यात खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या 'ई पीक पाहणी ॲप' वरून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करू शकतात.
प्रक्रिया कशी आहे? : e pik pahani kharip 2025
प्रत्येक हंगामाला शेतकऱ्यांना स्वतः पिकांची नोंद करण्यासाठी १५-१५ दिवस असे एकूण ४५ दिवस दिले जातात.
त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली नाही, त्यांच्यासाठी सहायक स्तरावर आणखी १५-१५ दिवस असे ४५ दिवस मिळतात.
ई पीक पाहणी नोंदणी कालावधी : e pik pahani 2025 last date
खरीप हंगाम
शेतकरी नोंद: १ ऑगस्ट – १४ सप्टेंबर
सहायक नोंद: १५ सप्टेंबर – २८ ऑक्टोबर
रब्बी हंगाम
शेतकरी नोंद: १ डिसेंबर – १५ जानेवारी
सहायक नोंद: १६ जानेवारी – २८ फेब्रुवारी
उन्हाळी हंगाम
शेतकरी नोंद: १ एप्रिल – १५ मे
सहायक नोंद: १६ मे – २९ जून
फळबाग पिके
शेतकरी वर्षभर कधीही नोंद करू शकतात (सहायक कालावधी सोडून).
ई-पीक पाहणी का महत्त्वाची आहे?
सातबारा उताऱ्यावर पीक नोंद नसल्यास शासनाची मदत, पीक विमा, आणि इतर योजना मिळणार नाहीत.
ई पीक पाहणी ॲपमधील नोंदी थेट सातबारा उताऱ्यावर जातील.
यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.
मदतीसाठी कोण?
शेतकऱ्यांनी शक्य तितकी नोंद स्वतः करावी.
अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकारी किंवा गावात नियुक्त सहायक मदत करतील.
👉 त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आपल्या शेतातील पिकांची नोंद 'ई पीक पाहणी मोबाईल ॲप' वरून नक्की करावी.