Animal Care : जनावरांच्या जखमेतील अळ्यांसाठी प्रभावी उपचार

09-11-2023

Animal Care : जनावरांच्या जखमेतील अळ्यांसाठी प्रभावी उपचार

Animal Care : जनावरांच्या जखमेतील अळ्यांसाठी प्रभावी उपचार

जनावरांना होणाऱ्या जखमांकडे पशुपालक फारस लक्ष देत नाहीत. पण हीच जखम पुढे वाढल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम जनावरावर होऊ शकतो. त्यामुळे या जखमेवर वेळीच उपचार करण गरजेच आहे.

 रोजच्या दिनचर्ये दरम्यान जनावरांना विविध ठिकाणी जखमा होत असतात.  वेळीच लक्ष दिल नाही तर या जखमांमध्ये आसडी म्हणजेच अळ्या पडतात. अशावेळी जखमेवर उपाचारासाठी वेगवेगळे स्प्रे किंवा मलम वापरले जातात. पण या औषधांनीही म्हणावा तसा फरक पडत नाही. मग अशा वेळेस तेल स्वरूपातील औषधांचा वापर जास्त गुणकारी ठरतो. हे तेल स्वरुपातील औषधे कोणती आहेत? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

जनावरांना होणाऱ्या जखमांकडे पशुपालक फारस लक्ष देत नाहीत. पण हीच जखम पुढे वाढल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम जनावरावर होऊ शकतो. त्यामुळे या जखमेवर वेळीच उपचार करण गरजेच आहे. ही जखम गंभीर का होते ते आधी समजून घेऊयात. 

जखमेत आसडी का पडते?

जनावरांना होणाऱ्या जखमेवर लगेच उपचार नाही केले तर जखम वाढत जाते. या जखमेवर माश्‍या बसतात, या माशांच्या पायांना चिटकून परोपजीवी किटकांची अंडी या जखमेवर येतात. ही अंडी उबल्यानंतर त्यातून नवजात आसडी बाहेर पडतात. ही आसडी जखमेतील खराब झालेले, कुजलेले मांस खाते. या आसडीमुळे ही जखम खोल होत जाते.  ही जखम वरून खूप लहान दिसत असली तरी  खोलवर गेलेली असते.  कालांतराने जखमेतील आसडी अंडी देते. त्यामुळे आसडीची संख्या वाढत जाते.

या जखमेतून घाण वास यायला लागतो अशा आसडीवर उपचार तत्काळ करणे अत्यंत आवश्यक असते. जखम वाढल्यानंतर त्यावर उपचार करण अत्यंत  खर्चिक असत. आसडीवर उपचार करण्यासाठी आज बाजारात मलम आणि स्प्रे स्वरूपात  औषधे उपलब्ध आहेत. आसडी असलेल्या जखमेवर मलमाचा वापर केला जातो. खोल गेलेल्या जखमेवर स्प्रे प्रकारातील औषधाचा वापर केला तर त्याचा एव्हडा परिणाम होत नाही. कारण  स्प्रे प्रकारातील औषध तयार करत असताना त्यात औषधी घटकांशिवाय काही उडणशील म्हणजे उडून जाणारे घटक मिसळतात. हे घटक लगेच उडून गेल्यामुळे अशा औषधांचा परिणाम जास्त काळ होत नाही. मग अशा वेळेस तेल स्वरूपातील औषधींचा वापर जास्त गुणकारी ठरतो

उपचारासाठी विविध तेल कोणते आहेत?

या विविध तेलापैकी कडुलिंबाच तेल हे अत्यंत गुणकारी आहेत. लिंबोळीतून काढले जाणारे कडुलिंब तेल हे जिवाणू विरोधी आणि परोपजीवी विरोधी असते. या तेलाच्या अत्यंत कडू चवीमुळे ज्या वेळेस हे तेल आसडीच्या संपर्कात येते त्यातून आसडीची खाद्य खाण्याची इच्छा नष्ट होते. अशा विविध गुणांमुळे आसडीयुक्त जखमेवर कडुलिंब तेल उपयुक्त ठरते.       

 कडुलिंबाप्रमाणेच जिवाणू आणि परोपजीवीच्या नियंत्रणसाठी करंज तेलाचाही चांगला उपयोग होतो. 

 याशिवाय जखणांवर उपचारासाठी टर्पेंटाईन तेलाचाही चांगला उपयोग होतो.  टर्पेंटाईन हे खरेतर एक वनस्पतिजन्य तेल आहे. आसडीयुक्त जखमेवर उपचार करत असताना फक्त औषधांच्या दुकानातून आणलेले टर्पेंटाईन तेलच उपचारासाठी वापरावे. हेच तेल रंगाच्या दुकानात देखील मिळत, पण यात रॉकेलची भेसळ असते. म्हणून फक्त औषधी म्हणून जखमेवर लावण्यासाठी प्रमाणित केलेले टर्पेंटाईन तेलच वापरावे.       

जखमांवर उपचारांसाठी कापूर ही तितकाच फायदेशिर आहे. या कापराचा वापर माश्‍यांना दूर करण्यासाठी केला जातो. कापराला असणाऱ्या विशिष्ट वासामुळे माश्‍या दूर पळतात. याशिवाय कापूर हा जखम भरुन येण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजेच इतर जखमांसोबतच आसडीयुक्त जखमेमध्ये कापूर अत्यंत गुणकारी ठरतो.         

अशाप्रकारे या तेलांचा वापर करुन तुम्ही घरच्याघरी जनावरांच्या जखमांवर घरच्याघरी उपचार करु शकता.

source: agrowon

पशुपालक, कडुलिंब, animal wounds,

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading