‘शासन आपल्या दारी’ योजनेचा सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाला लाभ - एकनाथ शिंदे

17-08-2023

‘शासन आपल्या दारी’ योजनेचा सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाला लाभ - एकनाथ शिंदे

Government scheme : ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाला लाभ - एकनाथ शिंदे

कृषी, शिक्षण, पर्यटन क्षेत्रांत राज्य आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ‘शासन आपल्या दारी’सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीकविमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला. आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली. आजवर साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या ६ हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे ६ हजार रुपये भर टाकली असून, दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या ३५ जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला. जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, की वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केले आहे.

व्हिडिओ स्वरूपात सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

source : agrowon

‘शासन आपल्या दारी’ योजनेचा सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाला लाभ, Government scheme, Maharashtra government

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading