किरकोळ नावे बदलले तरी पीक विमा मिळणार...

09-07-2024

किरकोळ नावे बदलले तरी पीक विमा मिळणार...

किरकोळ नावे बदलले तरी पीक विमा मिळणार...

आधार कार्ड, बँक खाते आणि सातबाऱ्यावरील नावात किरकोळ जरी बदल असेल तरी पीक विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही, असा मेसेज व्हॉट्सअॅपद्वारे फिरत आहे. 

मात्र, अशा किरकोळ फरकामुळे शेतकरी वंचित राहणार नाही, असे स्पष्टीकरण तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकार यांनी दिले आहे.

आधार कार्ड आणि बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु सातबाऱ्यावर कधी-कधी नावामध्ये किरकोळ बदल असतो. नावात थोडासा बदल असल्यास काही हरकत नाही. परंतु, पूर्ण नाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. 

नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल व तपासणीअंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.

त्यामुळे शेतकर्‍यांनी गोंधळून जावू नये. मात्र, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर होईल.

शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी. २ जुलैपर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत.

खरीप हंगामात विमा घेण्यासाठीची अंतिम दि. १५ जुलै आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तत्काळ उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे. सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा अर्ज भरताना शेतकर्‍यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. 

यासाठी शेतकर्‍याने स्वत:चा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे, असे तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकार यांनी सांगितले.

आधार बदल, बँक नाव, सातबारा नाव, पीक विमा, अधिकारी स्पष्टीकरण, शेतकरी विमा, नाव फरक, विमा योजना, पीक पाहणी, खरीप विमा, अर्ज प्रक्रिया, सुविधा केंद्र, अद्ययावत सातबारा, Aadhar change, Bank name, Land record, Crop insurance

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading