शेतकरी बांधवांनो सावध रहा योग्य शुल्कामध्ये पिक विमा अर्ज करा...
02-07-2024
शेतकरी बांधवांनो सावध रहा योग्य शुल्कामध्ये पिक विमा अर्ज करा...
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये शेतकर्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकर्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे. खरीप २०२४ मध्ये ३० जून पर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे.
तुम्हीच भरा पीक विमा अर्ज:
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति विमा अर्ज रुपये एक प्रमाणे योजनेतील सहभाग शासनाने देऊ केला आहे.
- शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज भरू शकतो. शेतकर्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो.
- कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपायच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात येते.
- केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो.
- सी.एस.सी केंद्र चालका मार्फत अर्ज करता येऊ शकतो.
- सी.एस.सी केंद्र चालकांना प्रति शेतकरी रुपये ४० प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेला आहे. सदर शुल्क संबंधित विमा कंपनी ही सी.एस.सी यांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सी.एस.सी चालक हे घेऊ शकत नाहीत.
- मात्र शेतकऱ्याने ७/१२, ८-अ स्वतः काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून online प्राप्त करून घ्यावा.
- राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्याकडून प्रति अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
- अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही.
- मात्र त्या साठी शेतकर्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.
- बिगर कर्जदार शेतकर्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत:
या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. १५ जुलै, २०२४ अशी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.