शेतीपिक नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी बंधनकारक!!!

27-09-2025

शेतीपिक नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी बंधनकारक!!!
शेअर करा

मराठवाड्यातील महापूरामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. त्यामुळे "ओला दुष्काळ" जाहीर करा, अशी मागणी होत आहे. सरकारकडून मदत दिली जात आहे, पण ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र क्रमांक) असणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.


काय बदल झाले आहेत?

  • केंद्र सरकारची अॅग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात कृषी विभागामार्फत राबवली जात आहे.

  • १५ जुलै २०२५ पासून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिक व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मिळणाऱ्या मदतीसाठी फार्मर आयडी आवश्यक असेल.

  • याबाबतचा शासन निर्णय २९ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला आहे.


फार्मर आयडी (farmer id) का आवश्यक आहे?

  • शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा फायदा लवकर व योग्य पद्धतीने मिळावा म्हणून.

  • शेतीपिक नुकसान नोंदवताना (पंचनामा करताना) फार्मर आयडी लिहिणं बंधनकारक असेल.

  • थेट बँक खात्यात पैसे (DBT प्रणाली) जमा करण्यासाठीही फार्मर आयडीची गरज राहील.

  • ई-पंचनामे सुरु होताच तिथेही हा क्रमांक आवश्यक राहील.

फार्मर आयडी, farmer id

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading