Farmer Pension : शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पेन्शन…!
20-01-2024
Farmer Pension : शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पेन्शन…!
कोण म्हणतं केवळ नोकरदारांसाठीच पेन्शन योजना आहे? केंद्र सरकार शेतकऱ्यांना पण पेन्शन देते. सर्वसामान्य नागरीक, मजूर, शेतकरी यांच्या आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी यासाठी पेन्शन योजना आहे. पण त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. चला तर जाणून घेऊयात..
आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटते नोकरदारांनाच उतारवयात पेन्शनचा लाभ मिळतो. पण तसो नाही. कष्टकरी वर्ग, मजूर, शेतकरी यांना सुद्धा पेन्शन मिळते. त्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु केल्या आहेत. त्याआधारे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करु शकता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजना आणि पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना या योजना किसान पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60 व्या वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
केंद्र सरकारने 31 मे 2019 रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ सुरु केली. शेतकरी पेन्शन योजनेतंर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येते. एका वर्षात 36,000 रुपये या योजनेतंर्गत मिळतात. या योजनेतंर्गत आतापर्यंत 4 कोटी 9 लाख 76 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही योजना राबवते.
असा घ्या फायदा
- केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. पीएम किसान सम्मान योजनेतंर्गत ही मदत करण्यात येते. शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेतंर्गत पेन्शनसाठी अर्ज करता येतो.
- या योजनेतंर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला त्याची नोंदणी करता येते. या योजनेत पेन्शनचा लाभ केवल पती-पत्नीलाच मिळतो. पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.
किती भरावा लागतो हप्ता
पीएम किसान पेन्शन योजनेसाठी वयानुसार हप्ता जमा करावा लागतो. ही रक्कम 55 ते 200 रुपये प्रति महिन्यापर्यंत असते. 18 वर्षाच्या या योजनेत नोंदणी करण्यासाठी केवळ 55 रुपये जमा करावे लागतात. 20 वर्षाच्या वयात प्रीमियमची रक्कम 61 रुपये आणि 40 व्या वर्षी ही रक्कम 200 रुपये महिना होते. या योजनेत जितकी रक्कम शेतकरी जमा करतात, तेवढीच रक्कम केंद्र सरकार जमा करते.
ही द्या कागदपत्रे
- 2 हेक्टर जमीन असणारे शेतकरी पात्र
- तेच या योजनेसाठी अर्ज करु शकतात
- आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक
- वयाचा दाखला आणि शेतीचे खासरा पत्र
- सरकारी बँक, सेवा केंद्रात योजनेची मिळले माहिती
- https://maandhan.in या साईटवर सविस्तर माहिती