महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान वादळी पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
02-05-2024
महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान वादळी पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सध्या कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी येत्या आठवड्यात हवामान कसं असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात 6 मेपर्यंत हवामान कोरडे राहील
राज्यामध्ये 6 मेपर्यंत हवामान कोरडं वातावरण राहणार आहे. 6 मेपर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढताच राहणा आहे. त्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
7 ते 11 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 6 मेपर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करुन ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. यासोबतच कोकणातही 7 मेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.