फळझाडांची खरी निवड कशी कराल? जाणून घ्या!
21-06-2025

फळझाडांची खरी निवड कशी कराल? जाणून घ्या!
राज्यातील पडीक व उपयोगात न आलेली जमीन आता हळूहळू फळबाग लागवडीच्या दिशेने वळताना दिसते. खरंच पाहिलं तर, फळबाग लागवडीची संकल्पना या जमिनींसाठी वरदान ठरत आहे. आज राज्यात तब्बल ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा यशस्वीपणे उभ्या आहेत. परंतु, फळझाडांची लागवड करताना सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे योग्य आणि खात्रीशीर रोपे किंवा कलमे निवडणे.
कलमांची / रोपांची निवड करताना लक्षात ठेवा:
1. दर्जेदार कलमे घ्या:
• जे रोपे तुम्ही लावणार आहात ती विश्वसनीय मातृवृक्षापासून तयार झाली आहेत का, हे पाहा.
• शक्य असल्यास शासकीय रोपवाटिकेतून किंवा कृषी विद्यापीठांमधूनच रोपे घ्या.
2. खरेदीची पावती अवश्य घ्या:
• कुठूनही रोपे घेतली, तरी त्याची लेखी पावती घ्या. हे भविष्यात उपयोगी पडते.
3. कलमाची स्थिती तपासा:
• कलम बांधलेले आहे का?
• जोड व्यवस्थित जुळलेला आहे का?
• झाड जोमदार व निरोगी आहे का?
4. योग्य जातीची खात्री करा:
• आपणास हवी तीच जातीची रोपे आहेत का? याची खात्री करा.
• उंचीपेक्षा कलमाची गुणवत्ता व मूळाचा स्त्रोत महत्त्वाचा आहे.
लागवडीची योग्य पद्धत:
1. पिशवीचे नियोजन:
• कलमाच्या पिशवीला उभा काप द्या.
• मुळांभोवती असलेला मातीचा गोळा न फोडता अलगद पिशवी काढा.
2. खड्ड्यात रोप लावा:
• गोळा दोन्ही हातांनी धरून खड्ड्याच्या मध्यभागी ठेवा.
• नंतर माती भरून हलक्या हाताने दाबा, शेवटी पायांनी सावधपणे माती दाबा.
3. पाणी व आधार:
• गरज असल्यास थोडं पाणी द्या.
• कलम पश्चिम बाजूला ६ इंच अंतरावर बांबूची काठी लावून त्याला बांधा.
योग्य रोपे निवडणे व नीट लागवड करणे हे फळबाग यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचे टप्पे आहेत. चुकीची रोपवाटिका किंवा चुकीची लागवड शेतकऱ्याचे वर्षानुवर्षे नुकसान करू शकते.
हे पण पहा : महाडीबीटी पोर्टलवर कोणकोणत्या योजना मिळतात? शेतकरी मित्रांनो नक्की पहा..!