शेळी पालन अनुदान योजना, जाणून घ्या अर्जाची सविस्तर प्रक्रिया…
10-07-2024
शेळी पालन अनुदान योजना, जाणून घ्या अर्जाची सविस्तर प्रक्रिया…
महाराष्ट्रात शेळीला गरीबाची गाय म्हंटल जात. शेती सोबत शेळीपालन मेंढीपालन हा प्रमुख जोड धंदा म्हणून ओळखला जातो. शेतकरी शेळी व मेंढी पालन करून कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्नही मिळू शकतात. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेळीपालन मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसाय. याच पारंपारिक व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने 25 मे 2019 रोजी शेळी पालन योजना या योजनेची सुरुवात केली.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच राज्यात रोजगार वाढवण्यासाठी राज्य शासनाने ह्या योजनेची सुरवात केली आहे. या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना उस्मानाबादी / संगमनेरी किंवा आपल्या राज्यातील वातावरणात तग धरेल अशा प्रजातीच्या पैदाक्षम 10 शेळ्या + १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या स्थानिक प्रजातीच्या १० मेंढया + १ नर्मदा असं गट वाटप करण्यात येईल. शेळीपालन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे
वाचकांना विनंती
वाचकांना विनंती आहे की लेख आपण शेवटपर्यंत वाचावा आणि तुमच्या परिसरातील जे कोणी शेतकरी व पशुपालक असतील, तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | शेळीपालन योजना |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
योजनेची सुरुवात | 25 मे 2019 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | शेळी मेंढी गट वाटप |
योजनेचे उद्देश | रोजगार उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
शेळीपालन योजनेचे उद्देश :
- महाराष्ट्रातील हवामान हे शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने शेळीपालनाकडे वळवने हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश
- शेळीपालन, मेंढी पालन या व्यवसायाला चालना देणे हा देखील उद्देश
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक तसाच सामाजिक विकास होऊन त्यांची आर्थिक उन्नती व्हावी.
- शेतीसोबत जोड धंदा सुरू करणे
- शेतकऱ्याच जीवनमान सुधारणे
शेळीपालन योजनेचे स्वरूप
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्थानिक वातावरणात तग धरू शकतील अशा संगमनेरी उस्मानाबादी प्रजातीच्या पैदासक्षम 10 शेळ्या + १ बोकड किंवा माडग्याल किंवा दख्खनी किंवा अन्य स्थानिक वातावरण तक धरतील अशा प्रजातीच्या दहा १० मेंढ्या आणि एक नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल
- या योजनेमध्ये लाभार्थ्याला या शेळ्या मेंढ्यांची वाटप होईल त्यांच्या प्रजातीची निवड ही संपूर्ण लाभार्थ्याची राहील.
- या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा राहील व उर्वरित 25 टक्के रक्कम लाभार्थ्याची स्वतःची किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणे गरजेचे आहे.
- खुल्या वर्गासाठी किंवा इतर मागासवर्गासाठी 50% हिस्सा जो आहे हा राज्य शासनाचा राहील व उर्वरित पन्नास टक्के हिस्सा लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणं आवश्यक आहे
- शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर त्यांची वाहतुकीचा खर्च हा त्या लाभार्थ्याचा राहील. वाहतुकीचा खर्चासाठी ह्या योजनेत कोणतीच तरतूद नाही
- या योजनेअंतर्गत फक्त लाभार्थ्यांना शेळ्या व मेंढ्या दिल्या जातील त्यांना लागणारे तसेच आरोग्य सुविधा औषधोपचार हे या योजनेमध्ये असणार नाही किंवा या साठी कोणतेच अनुदान हे दिले जाणार नाही
शेळी पालन योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम दिला जातो
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- महिला बचत गटातील लाभार्थी
- अल्पवाचल्प अत्यल्पभूधारक शेतकरी
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले )
शेळीपालन योजनेची कार्यपद्धती हे खालील प्रमाणे राहील.
- सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांना राष्ट्रकूट बँकेत त्यांचे स्वतःचे खाते उघडणे आवश्यक राहील, आणि जर एखाद्या लाभार्थ्याची राष्ट्रकुल बँकेत खाते असेल तर ते बचत खाते या योजनेची संलग्न करून घेणे आवश्यक राहील जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही थेट त्याला व त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल
- लाभार्थ्याला त्याच बँक अकाउंट हे त्याच्या आधार क्रमांक पॅन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक याच्याशी जोडून घेणे बंधनकारक राहील
- समजा एखाद्याला भरती खुल्या वर्गाचा असेल तर त्याला 50% स्वतःची आयुष्याची रक्कम ही जमा केल्याची खात्री केल्यानंतरच अनुदान मिळणार आहे
- या योजनेमध्ये वरील सांगितल्याप्रमाणे स्थानिक वातावरणामध्ये तग धरून ठेवणाऱ्या शेळ्या व मेंढ्या यांची निवड लाभार्थ्यांना करायची आहे
शेळीपालन योजनेचे काही नियम आणि अटी आहेत ते खालील प्रमाणे
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
- याआधी अर्जदारांनी कोणत्याही शेळी मेंढी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- एका कुटुंबातील एकच सदस्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे
- ज्या व्यक्तीला पशुपालन करण्याची इच्छा आहे त्याच्या नावावर स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे
- या शेळी व मेंढी पालनाचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे
शेळी पालन योजनेअंतर्गत अर्ज करताना लागणारी किंवा आवश्यक असणारी कागदपत्र
- अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमाती मध्ये असेल तर त्याच्या जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदार हा दारिद्र रेषेखाली असेल तर त्याचा दाखला
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे (रहिवासी दाखला)
- अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा व आठ अ आणि ग्रामपंचायत नमुना 8
- अर्जदाराची शेळीपालनाची प्रशिक्षण झाली आहे याचे प्रमाणपत्र
- घरपट्टी
- विजेचे बिल
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
शेळीपालन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून या योजनेचा अर्ज डाऊनलोड करायचा आहे
- अर्ज भरल्यानंतर वरील सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्राची झेरॉक्स प्रत या अर्थ सोबत जोडायची आहेत
- या भरलेला अर्ज जो आहे तो आपल्याला ग्रामपंचायत कार्यालय अथवा जिल्हा कार्यालयात जमा करायचे आहे