शेळीपालनातील पोषण व्यवस्थापन कसे करावे..?

20-11-2024

शेळीपालनातील पोषण व्यवस्थापन कसे करावे..?

शेळीपालनातील पोषण व्यवस्थापन कसे करावे..?

शेळ्यांमध्ये इतर प्रजातींपेक्षा पायाभूत चयापचयाचा दर अधिक असल्याने, त्यांना गायी आणि मेंढ्यांच्या तुलनेत जास्त पोषण आहाराची गरज असते. शेळ्या पोषक घटकांचे दूध उत्पादनात रूपांतर करण्याची ४५ ते ७१ टक्क्यांपर्यंतची कार्यक्षमता दाखवतात. 

याशिवाय, निसर्गतः त्यांच्यात झाडपाल्यातील टॅनीन नावाच्या घटकाला पचविण्याची क्षमता असते. मात्र, झाडपाल्याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. यशस्वी शेळीपालनासाठी आहार व्यवस्थापन हे पंचसूत्रांपैकी एक महत्त्वाचे सूत्र आहे. करड, माद्या, व नर यांचा आहार कसा असावा, हे पाहूया.

करडांचा आहार:

  • दूध: तीन महिने वयापर्यंत करडांना दूध पाजावे.
  • पशुखाद्य व चारा: पहिल्या पंधरवड्यानंतर वाळलेला चारा व पशुखाद्य चघळण्याची सवय लागेल, यासाठी थोडे थोडे देणे सुरू करावे.

खाद्याचे प्रमाण:

  • एक ते दोन महिने: ५०-१०० ग्रॅम खाद्य
  • दोन ते तीन महिने: १००-१५० ग्रॅम खाद्य
  • तीन ते चार महिने: २००-२५० ग्रॅम खाद्य
  • चार महिन्यांनंतर: ३५०-५०० ग्रॅम खाद्य

माद्यांचा आहार:

  • चराऊ पद्धत: माद्यांना ६ ते ८ तास चरायला पुरेसा वेळ द्यावा.
  • बंदिस्त शेळीपालन:
    दिवसा: ४ किलो हिरवा चारा व १ किलो वाळलेला चारा द्यावा.
    रात्री: जर चाऱ्याची कमतरता असेल, तर १ किलो हिरवा चारा आणि ५०० ग्रॅम वाळलेला चारा पुरवावा.
  • पशुखाद्य: दररोज ३५० ग्रॅम पशुखाद्य द्यावे. पैदास हंगामात हे प्रमाण ५०० ग्रॅमपर्यंत वाढवल्यास जुळ्यांचे प्रमाण अधिक राहते.
  • विण्यापूर्वी: विण्यापूर्वी दोन महिन्यांचा आहार पौष्टिक ठेवावा, ज्यामुळे वजनदार करड जन्माला येतो आणि दूध उत्पादन वाढते.
  • डहाळ्यांचा समावेश: आहारात लिंब, बाभुळ, बोर, अंजन यांचा समावेश केल्यास शेळ्या ६०-७०% भूक द्विदलचारा व झाडपाल्याने भागवतात.

नरांचा आहार:

  • दैनंदिन खाद्य: दररोज ३५०-४०० ग्रॅम पशुखाद्य द्यावे.
  • पैदास हंगाम: प्रथिनयुक्त चारा, शेंगदाणा पेंड, क्षार मिश्रण, व मोड आलेली मटकी द्यावी.

पाणी व्यवस्थापन:

  • पाणी देण्याची वेळ: शेळ्यांना किमान दिवसातून एकदा तरी पाणी पाजावे.
  • पाणीप्रमाण: रोज २-३ लिटर पाणी हवामानानुसार द्यावे.
  • थंड हवामान: स्वच्छ व कोमट पाण्याचा पुरवठा करावा.

शेळी पोषण, शेळी आहार, पोषण व्यवस्थापन, शेळी चाराणे, करड आहार, माद्या आहार, आहार, दूध उत्पादन, पशुखाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, चराऊ पद्धत, द्विदल चारा, झाडपाला आहार, शेळीपालन, शेळीपालन तंत्रज्ञान, shetkari, shelipalan, goat

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading