शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार या महत्वाची सुविधा
28-10-2022
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. पीएम किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) अशा अनेक योजना सुरू आहेत, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो.
आता शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विशेष योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होणार आहे. सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सांगितले आहे.
किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर (Kisan Credit Card) घेतलेल्या पैशावर सरकारकडून सबसिडी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सहसा कमी व्याज द्यावे लागते.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज असा करा
तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. यामध्ये मागितलेली कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. यामध्ये 2 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. याशिवाय पेरणी केलेल्या पिकाची माहितीही तुम्हाला द्यावी लागेल.
कृषि विभाग योजना
source : krishijagran