पडीक जमीन भाड्याने दिल्यावर सरकारकडून मिळणार 30 हजार रुपये
17-01-2024
पडीक जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाड्याने दिल्यावर सरकारकडून एकरी वर्षाला मिळणार 30 हजार रुपये असा करा अर्ज
Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या कृषी क्रांती या वेबसाईट वर सतत नवनवीन सरकारच्या योजनेविषयी माहिती पाहत असतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ देखील अनेक शेतकरी बांधव घेत असतात. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या सरकारने कोणकोणत्या योजना काढल्या आहेत. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला कोठे जावे लागेल. किंवा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागेल अशी संपूर्ण माहिती आपण या वेबसाईट वर पाहत असतो. आज अशाच एका महत्त्वपूर्ण सरकारच्या योजनेबद्दल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
शेतकरी हा शेती करून चांगले उत्पादन काढत असतो. परंतु अतिवृष्टीमुळे, किडीमुळे किंवा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याचे उत्पादन हे कमी होत असते. परंतु तुम्हाला काहीही न करता एक एकर शेत जमिनीचे 75 हजार रुपये मिळतील असे ऐकल्यावर तुम्ही लगेच काय योजना आहे हे नक्की पाहतान. चला तर मग आपण अशाच एका योजने बद्दल माहिती पाहुयात, की तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज नाही. आणि फक्त शेती भाड्याने देऊन वर्षाला एक एकर जमिनीचे 75 हजार रुपये मिळतील अशी योजना पाहुयात, शेतकऱ्यांना दिवसा 24 तास वीज मिळावी या कारणामुळे सरकार विविध योजना राबवित आहे. कृषी सोलार कृषी पंप ही एक त्यातली सर्वात मोठी योजना आहे. कारण कृषी सौर पंपनी शेतकरी दिवसा आपल्या शेतीला पाणी देऊ शकतात. यासाठी ही योजना काही अनुदानावर शेतकऱ्यांना सरकारमार्फत दिली जाते. त्याचबरोबर आता सरकार सौर कृषी वाहिनी तयार करणार आहे.
Yojana ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी तयार करण्यासाठी सरकारला काही जागा भाड्याने लागत आहे. यामुळे सरकार आता शेतकऱ्याकडून काही बिनकामी जागा किंवा पदवी जागा किंवा इतर कोणतीही जागा भाड्याने घेत आहे. त्याचबरोबर भाड्याने घेतलेल्या जमिनीचा सरकार शेतकऱ्यांना चांगला मोबदला सुद्धा देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील खूपच मोठा फायदा होईल आणि सरकारच्या या योजनेला जमीन देखील मिळेल.
शेतकऱ्याने सरकारला भाड्याने एक एकर जमीन दिल्यावर शेतकऱ्याला सरकार तब्बल 30000 हजार रुपये प्रति वर्षाला मोबदला म्हणून देणार आहे. यासंदर्भात सरकारकडून शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. तो शासन निर्णय देखील आपण या बातमीत सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याचबरोबर शासन निर्णयाची पीडीएफ यादीदेखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे.
कृषी क्षेत्रात 24 तास अखंडपणे वीज पुरवठा करता यावा म्हणजे शेतकऱ्यांना रात्री शेताला पाणी देण्याची गरज लागणार नाही. यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांना कोणताही धोका होऊ शकत नाही. किंवा जीवित हानी होऊ शकत नाही. कारण रात्रीच्या वेळी वन्य प्राणी हे शेतात वावरत असतात. यामुळे वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्याला मोठी जखम झाली. अशा अनेक बातम्या आपण पाहतो आता सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्याला दिवसादेखील लाईट उपलब्ध होईल.
शेतकरी दिवसा शेताला पाणी देऊ शकतो. यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या खूपच फायद्याचे राहील. त्याचबरोबर शेतकऱ्याकडून भाड्याने जमीन देखील घेतली जाणार आहे. ही योजना 2017 पासून सुरू करण्यात आले आहे. या योजनेमार्फत माहितीनुसार प्रतिदिन 2 मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जात आहे. आणि या विजेचा वापर शेतकरी बांधव करत आहेत. त्याच बरोबर या योजनेसाठी लागणारे जमीनदेखील. शेतकऱ्याकडून सरकार खरेदी करत आहे. आणि शेतकऱ्यांना चांगला मोबदला देत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी जमीन भाड्याने दिली आहे. त्या शेतकऱ्याला तब्बल 30000 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला दिला जाणार आहे. याची माहिती आपण खाली पाहुयात.
या योजनेत भाड्याने जमीन देण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असू शकतात. शासन निर्णयानुसार भाड्याने जमीन देण्यासाठी शेतजमिनीचे अंतर हे महावितरणाच्या उपकेंद्र पासून पाच किलोमीटर पर्यंत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महावितरण शेतकऱ्याकडून कमीत कमी तीन एकर जमीन भाड्याने घेऊ शकते. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त म्हटल्यावर पाच एकर पर्यंत जमीन सरकार घेऊ शकते.
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजेच कृषी क्षेत्रात 24 तास वीज पुरवठा व्हावा. यामुळे राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना सुरु करण्याचा निर्णय हा 2017 सालच घेतला आहे. या व्यसनापासून प्रतिदिन म्हणजेच दर दिवशी दोन मेगावॅट एवढ्या विजेची निर्मिती केली जाते.