Grafting : अश्या पद्धतीने करा फळझाडांना कलम.
22-09-2023
Grafting : अश्या पद्धतीने करा फळझाडांना कलम.
फळझाडांची लागवड कलम ही उत्कृष्ट प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये दोन्ही फळ वृक्षांच्या वनस्पतिक आवश्यकतांनुसार वनस्पतिक संयोजना केली जाते. या प्रक्रियेच्या माध्यमातून, एक फळाच्या शाखेच्या मुळावर इतर फळ वृक्षाच्या जडांवर तीन वर्षांच्या आयातीय प्रक्रियेसह, निकाल केला जातो. जर आपल्याला कोणत्याही वृक्षाच्या नकली फळाच्या गुणधर्माच्या आवश्यकता आहे. यामुळे, आपल्या वृक्षांच्या विकासाची(Plant Growth) गती वाढेल आणि आपल्याला एक सुंदर फळांचा उत्पादन होईल.
फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी इत्यादी कामे खर्चिक व त्रासदायक होतात. त्यामुळे फळझाडांची लागवड कलमे लावून करतात.
कोय कलम :
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत असून, मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात. एका वर्षात ही कलमे लागवडीसाठी तयार होतात. या पद्धतीत ५० टक्के यश मिळते. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५ ते २० दिवसांचे रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. अशा रोपांची पाने पूर्ण उघडलेली नसावीत. पाने व देठांचा रंग तांबडा असावा. रोपाचा खालचा ७ ते ९ सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा. आंबा (Mango)कलमांची शाखीय वाढ अधिक सुदृढ होण्यासाठी कलमे २५ बाय ३५ सेंटीमीटर आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नवीन वाढणाऱ्या फुटीला काठ्यांनी आधार द्यावा.
गुटी कलम :
या पद्धतीमध्ये पेरू, जाम, चेरी, दालचिनी इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी केली जाते. यासाठी ४० ते ५० सेंटीमीटर लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर १.५ सेंटीमीटर रुंदीची पूर्ण साल काढून घ्यावी. त्यानंतर तेथे ओले शेवाळ लावावे आणि ते प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावे. पावसाळ्यात गुट्या चांगल्या प्रकारे होतात. सुमारे अडीच ते तीन महिन्यात या गुट्यांमधून मुळे बाहेर दिसू लागतात. तेव्हा गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात. नंतर गुटीवरील ५० टक्के पाने कमी करावीत. या पद्धतीत ७० ते ८० टक्के यश मिळते. लवकर व अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी आयबीए किंवा एनएए ही संजीवके २००० ते ५००० पीपीएम टाल्क पावडरमध्ये किंवा लॅनोलीन पेस्टमध्ये मिसळून गुटीच्या वरच्या कापावर लावावे.
व्हिनिअर कलम :
या पद्धतीत ८ ते १० महिने वयाची रोपे खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस सुमारे सेंटीमीटर उंचीवर ५ ते ७ सेंटीमीटर लांबीचा तिरकस उभा काप घ्यावा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या एकतृतीयांपेक्षा जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या टोकास थोडासा आडवा, तिरकस काप घेऊन साल, आतील भाग काढून घ्यावा, नंतर मातृवृक्षाच्या काडीवर सुमारे १५ सेंटीमीटर उंचीवर एका बाजूने ५ ते ७ सेंटीमीटर आकाराचा तिरकस काप द्यावा, ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यावी. या कापाची खोली फांदीच्या १/२ जाडीपेक्षा जास्त असू नये.
Source:lokmatAgro