खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीच्या मार्गदर्शक सूचना: शेतकऱ्यांसाठी महत्वाचे सल्ले
28-05-2024
खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीच्या मार्गदर्शक सूचना: शेतकऱ्यांसाठी महत्वाचे सल्ले
सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की आपण खरीप हंगाम मध्ये जे पीक घेणार आहोत त्याचे बियाणे खरेदी करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी
- बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेते कडून खरेदी करावे.
- बियाणे खरेदी वेळेस त्या बियाणाचे पक्के बील म्हणजे GST बील घ्यावे
- तसेच बियाणे च्या पाकीट वर त्याचा लॉट नंबर आहे का याशिवाय अंतिम मुदत आहे का याची खात्री करावी.
- बियाणे पेरणी करताना त्यातील काही बियाणे शिल्लक राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून जर उगवले नाही बियाणे तक्रार नोंद करायला अडचण येत नाही.
- कोणीही जास्त पैसे देऊन बियाणे खरेदी करू नये यामुळे त्या विक्रेत्याचे पोट भरते परंतु नुसकान आपण आपले करून घेत असतो.
- आपण जी रक्कम बियाणे घेताना अदा केली आहे त्याच रकमेचे बील घ्यावे दुसऱ्या रकमेचे बील घेऊ नये.
- जर कोणी असे जास्त रक्कम घेऊन बियाणे विकत असेल तर आपल्या तालुका कृषी ऑफिस मध्ये जाऊन तक्रार नोंद करावी.