हरभरा बाजार तेजीत, या बाजार समितीत दरांमध्ये वाढ..
25-07-2025

हरभरा बाजार तेजीत, या बाजार समितीत दरांमध्ये वाढ..
श्रावण महिना सुरू होताच सणांचा हंगाम जवळ येतो आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा अशा विविध सणांमध्ये पुरणपोळीचा खास स्वयंपाक केला जातो.
हे पण पहा: पेरू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, दरात लक्षणीय वाढ..!
हरभरा डाळीचे दर गगनाला भिडले!
गेल्या आठवडाभरात हरभऱ्याच्या किंमतींमध्ये क्विंटलमागे तब्बल ₹५०० ते ₹६०० इतकी वाढ झाली आहे. परिणामी हरभरा डाळही महागली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात डाळीवर आधारित पदार्थांची चव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचा तोटा, व्यापाऱ्यांचा फायदा:
सुमारे ९०% शेतकऱ्यांनी आपला हरभरा एप्रिल-मे महिन्यांतच विकला, जेव्हा भाव तुलनेने कमी होते. आर्थिक गरजेमुळे त्यांनी मिळेल त्या दरात माल विकला. मात्र आता दर झपाट्याने वाढत असल्याने स्टॉकिस्ट व्यापाऱ्यांना जबरदस्त फायदा होतो आहे.
काही दूरदृष्टी असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा घरीच साठवून ठेवला आहे. यामुळे दरवाढीचा खरा लाभ त्यांनाच मिळणार, असं चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.
सासवड बाजार समितीतील हरभऱ्याचे महिन्यानुसार दर (प्रतिक्विंटल):
महिना | दर (₹) |
मार्च | ५,११० |
मे | ५,८०० |
जून | ५,३०० |
जुलै | ५,९५१ |
सणावर महागाईचा सावट?
श्रावणात होणाऱ्या सणांची सुरूवात नागपंचमीपासून होते. यावेळी पुरणपोळी, डाळीचे पदार्थ आवर्जून बनवले जातात. पण हरभऱ्याच्या वाढत्या दरामुळे सणाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.