14 ते 17 नोव्हेंबर: राज्यात जोरदार पावसाची शक्यता...
14-11-2024
14 ते 17 नोव्हेंबर: राज्यात जोरदार पावसाची शक्यता...
राज्यामध्ये दि. १४ नोव्हेंबर पासून पावसाचे वातावरण राहणार आहे असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे. दि.१४ ,१५ ,१६, १७ दरम्यान अक्कलकोट, तासगाव, सोलापूर, सांगली, सातारा, इस्लामपूर, श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, कर्नाटक, रत्नागिरी ,रायगड ,सिंधुदुर्ग तसेच पूर्ण कोकण पट्टी मध्ये पाऊस पडणार आहे.
राहिलेल्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे असे पंजाबराव डख यांनी संगितले. अंदाजे दुपारनंतर मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल. दि.१७ नोव्हेंबर पासून पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे द्राक्ष शेतकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच द्राक्ष फवारणी व बाकीची कामे पावसाआधी उरकून घ्यावेत असेही ते म्हणाले. सविस्तर म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खांदेश व मराठवाडा असे त्यांनी सांगिले आहे.