राज्यात मुसळधार पावसाचे अलर्ट, कोकण व पश्चिम घाटात जोरदार पाऊस...
03-08-2024
राज्यात मुसळधार पावसाचे अलर्ट, कोकण व पश्चिम घाटात जोरदार पाऊस...
राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या असून पीक विम्यासाठीही अर्ज केले आहेत. काही पिकांच्या वाढीसाठी आणि आंतरमशागतीसाठी आता पावसामध्ये खंड अपेक्षित आहे.
पण राज्यातील चारही विभागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. त्याबरोबर, आज राज्यातील पश्चिम घाट, कोकण व मध्य महाराष्ट्रामधील दोन जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यामधील सांगली, सोलापूर, धाराशिव व लातूर हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, पालघर, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज कुठे आहेत अलर्ट?
पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.