Heavy Rain Warning : देशावर संकट, 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान मोठा इशारा, पुढील 48 तास महत्वाचे
10-11-2025

Heavy Rain Warning : देशावर संकट, 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान मोठा इशारा, पुढील 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather Update : देशभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने देशावर डबल संकटाचा इशारा दिला आहे. एका बाजूला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून दुसरीकडे कडाक्याच्या थंडीची लाट पसरत आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होणार आहेत.
मागील काही दिवसांपासून काही भागात गारठा वाढला आहे तर काही ठिकाणी अजूनही पावसाची जोरदार सरी सुरू आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पावसाचे ढग अजूनही टिकून आहेत.
10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इतर भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. महाबळेश्वरच्या तुलनेत जळगावमध्ये तापमानात सर्वाधिक घट झाली असून तापमान 10.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
मुंबईतही रविवारी किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे — चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे.
हवामानातील हा बदल रब्बी पिकांसाठी पोषक असल्याचे तज्ञ सांगत आहेत. गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी आणि आर्द्रता योग्य वातावरण निर्माण करत आहे. पुढील काही दिवसांपर्यंत महाराष्ट्र आणि देशातील अनेक भागांमध्ये गारवा आणि धुक्याचे प्रमाण वाढणार आहे.